डेंगी, चिकनगुनियाचाही नवा व्हेरियंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेंगी, चिकनगुनियाचाही नवा व्हेरियंट
डेंगी, चिकनगुनियाचाही नवा व्हेरियंट

डेंगी, चिकनगुनियाचाही नवा व्हेरियंट

sakal_logo
By

डेंगी, चिकनगुनियाचाही नवा व्हेरियंट
गडहिंग्लजला चार रुग्ण; लक्षणांमध्ये बदल, भीती न बाळगण्याचे आवाहन

अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : कोरोना विषाणूचे वेगवेगळे नवे व्हेरियंट येत होते, तशाच पद्धतीने आता डेंगी आणि चिकनगुनिया विषाणूसंदर्भात घडले आहे. या दोन्ही साथीच्या रोगांच्या लक्षणामध्ये बदल आढळला असून, मंगळवारीच (ता. १२) गडहिंग्लजमधील चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बदललेला व्हेरियंट सौम्य प्रकारचा आहे. त्यापासून जीवाला कोणताच धोका नाही. यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षकांनी केले आहे.
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून हा आजार आहे. चिकनगुनिया, डेंगीसदृश आजार अशीच चर्चा अजूनही आहे; परंतु, रक्त तपासणीचा अहवाल मात्र निगेटिव्ह येतात. एवढेच नव्हे तर उपजिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांचा रक्त तपासणी अहवालही निगेटिव्ह आला. डेंगी, चिकनगुनिया सदृश लक्षणे तर आहेत. मात्र, एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह येत नसल्याने डॉक्टरही आश्‍चर्यचकीत झाले. दुसरीकडे अहवाल निगेटिव्ह येत असला चिकनगुनिया व डेंगी आजाराचेच उपचार केल्याने रुग्ण बरे झाले आहेत, हे सुद्धा नाकारता येणार नाही. सुरुवातीला नदीवेस भागात आढळणारे रुग्ण आता शहरभर झाले आहेत. रुग्णांची संख्या मोठी आहे. एकीकडे रक्ताचे नमुने निगेटिव्ह आणि दुसरीकडे वाढती रुग्णांची संख्या यामुळे या आजाराविषयी चिंता व्यक्त होत होती. अखेर आजच्या रक्त तपासणी अहवालात दोघांना डेंगी तर दोघांना चिकनगुनिया असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या आजाराचा विषाणू वेगळा नसून ‘एडीस इजिप्ती’ डासापासून पसरणारा डेंगी व चिकनगुनियाच असल्याचे सिद्ध झाले आहे.

35612
पारंपारिक लक्षणे
चिकनगुनिया रुग्णांमध्ये सर्वसाधारणपणे पाय सुजणे, अंगाला फोड उठणे, सांधेदुखी अशी लक्षणे
डेंगी पॉझिटिव्ह रुग्णांच्या शरीरातील पांढऱ्या पेशी झपाट्याने कमी होतात.
डेंगी रुग्णांना पांढऱ्या पेशीत मोठी घट, बाहेरून पेशी देण्याची वेळ, वाढत जाणारा ताप

फोटो 35611
लक्षणांमधील बदल
गडहिंग्लजमध्ये मात्र बहुतांशी रुग्णांना अंगाला फोड नाहीत; मात्र त्वचा लालसर होऊन खाज सुटण्याचे प्रमाण अधिक
हा आजार कमी होऊनही काही रुग्णांना एक, दोन महिन्यांपासून सांधेदुखीचा त्रास अजून सुरू
येथील रुग्णांच्या शरीरातील पांढऱ्‍या पेशी अगदी नगण्य प्रमाणात घटल्या
कोणालाही बाहेरून पांढऱ्या पेशी द्याव्या लागलेल्या नाहीत; ताप मात्र जास्त कालावधीपर्यंत

* निगेटिव्ह-पॉझिटिव्हचा खेळ
डेंगी व चिकनगुनियाबाबत निगेटिव्ह-पॉझिटिव्हचा खेळ पाहायला मिळत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातून आधीपासूनच सीपीआर प्रयोगशाळेत रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले जात आहेत. तेव्हा सर्व अहवाल निगेटिव्ह आले. दोन दिवसांपूर्वी दिलेल्या नमुन्यांचा अहवाल आज आला. त्यात चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही.

गडहिंग्लजला आढळणारे रुग्ण चिकनगुनिया, डेंगीचेच होते, याची कल्पना होती; परंतु अहवाल निगेटिव्हमुळे येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम होता. यामुळे रक्ताचे नमुने सीपीआरकडे पाठविले. त्यात चौघे जण डेंगी व चिकनगुनिया पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. व्हेरियंट काहीसा बदलल्याचेही संकेत आहेत; परंतु ते जीवघेणे नाहीत. पुण्याला पाठविलेल्या नमुन्यांचा अहवालही यापेक्षा वेगळा असणार नाही.
- डॉ. चंद्रकांत खोत, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय, गडहिंग्लज

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76649 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..