
वीजेच्या धक्क्याने मृत्यू
35581
अश्विनी पाटील
विजेचा धक्का बसून
नांगनूरला महिलेचा मृत्यू
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १२ : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे विजेच्या धक्क्याने एका महिलेचा मृत्यू झाला. अश्विनी सागर पाटील (वय ३६) असे मृताचे नाव आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबतची माहिती अशी की, सागर पाटील हे पोल्ट्री व्यावसायिक आहेत. राम मंदिराजवळ त्यांचे घर आहे. याच ठिकाणी त्यांच्या नव्या घराचे बांधकाम सुरू आहे. आज सकाळी त्यांची पत्नी अश्विनी या नेहमीप्रमाणे घरातील काम आटोपून सकाळी दहाच्या सुमारास कपडे धुण्यासाठी पाण्याच्या टाकीच्या शेजारी असलेला विद्युतपंप चालू करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना जोराचा विजेचा धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, तीन मुली असा परिवार आहे. अश्विनी यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, अश्विनीचे पती सागर पाटील यांनी हलकर्णी पोलिस दूरक्षेत्रात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76689 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..