धरण दहा दिवसात भरेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरण दहा दिवसात भरेल
धरण दहा दिवसात भरेल

धरण दहा दिवसात भरेल

sakal_logo
By

...तर राधानगरी धरण
दहा दिवसांत भरेल
कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर
कोल्हापूर, ता. १२ : जिल्ह्यात संततधार पाऊस असाच सुरू राहिला, तर राधानगरी धरण आठ ते दहा दिवसांत भरेल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली.
श्री. बांदिवडेकर म्हणाले, ‘‘आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी जलसंपदा विभागाच्या यंत्रणा कार्यरत आहेत. दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे यावर्षीही धरण उशिरा भरण्याचा एक मोठा प्रयत्न लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जलसंपदा विभागामार्फत केला जात आहे. राधानगरी धरणाचे आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू आहेत. धरणावर हे कर्मचारी रात्रंदिवस चोखपणे कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना, इशारा विभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तसेच व्हाट्सअपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत दिली जात आहे. तसेच पूर्वसूचना (अलर्ट) वेळेच्या आधी दिल्या जातील, याची दक्षताही जलसंपदा विभागाकडून घेतली जात आहे. राधानगरी धरण हे राजर्षी शाहूकालीन ऐतिहासिक धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची क्षमता ८.३६ टीएमसी असून गेले पंधरा दिवस पावसाचा रोज जोर आहे. साधारण १२० ते १३० मिलिमीटर रोज पाऊस पडतोय. धरणाची क्षमता ८.३६ असली तरी आज रोजी धरण ४.७ टीएमसी म्हणजे साधारण ५५ टक्के पाणीसाठा आज आहे. दाजीपूर, हसणे आणि पडळी मधला पाऊस या धरणामध्ये एकत्रित येतो. असाच जर पावसाचा जोर रोज सुरू राहिला तर साधारण धरण भरायला आठ ते दहा दिवस लागू शकतात.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76724 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top