आज गुरूपोर्णिमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज गुरूपोर्णिमा
आज गुरूपोर्णिमा

आज गुरूपोर्णिमा

sakal_logo
By

गुरूपोर्णिमेनिमित्त
आज विविध कार्यक्रम

कोल्हापूर ः गुरूपोर्णिमेनिमित्त उद्या (बुधवारी) विविध मंदिरांसह अध्यात्मिक संस्थांच्या वतीने गुरूपूजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पहाटेपासूनच विविध मंदिरात धार्मिक विधींना प्रारंभ होईल. श्री दत्त, स्वामीसमर्थ आणि साई मंदिरात विशेषतः भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दोन वर्षे कोरोनामुळे या सोहळ्यावर निर्बंध होते. पण, यंदा कोणत्याही निर्बंधाशिवाय हे सोहळे होणार आहेत. सामूहिक ध्यान साधनेबरोबरच सत्संग आणि महाप्रसादाचेही काही संस्थांनी आयोजन केले आहे. दरम्यान, गुरूपोर्णिमेच्या निमित्ताने मातृ-पितृ पूजनाचे कार्यक्रमही विविध शाळांत होणार आहे. त्यासाठी गुलाबाच्या फुलांनाही मागणी असून, फुलांचे दर वधारले आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेतर्फे शाहूपुरी गवत मंडई येथील आयर्विन ख्रिश्चन मल्टीपर्पज हॉलमध्ये सायंकाळी सामूहिक गुरूपूजा होणार आहे. भावातीत ध्यान साधक समूहातर्फे भावातीत ध्यानावर मोफत व्याख्यान होणार आहे. ध्यान प्रशिक्षक सुनीलकुमार वैद्य (जबलपूर) मार्गदर्शन करणार असून, लक्ष्मीपुरीतील सत्यवादी भवन शेजारील आयुर्वेद पंचकर्म सेंटरमध्ये सायंकाळी सहाला हे व्याख्यान होईल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76735 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..