सायबर महाविद्यालयात राष्ट्रीय युवा धोरणवर चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबर महाविद्यालयात राष्ट्रीय युवा धोरणवर चर्चा
सायबर महाविद्यालयात राष्ट्रीय युवा धोरणवर चर्चा

सायबर महाविद्यालयात राष्ट्रीय युवा धोरणवर चर्चा

sakal_logo
By

35618
सायबर’मध्ये राष्ट्रीय युवा धोरणवर चर्चा
कोल्हापूर, ता. १३ ः राष्ट्रीय युवा धोरण ठरत असताना या तरुणांची भूमिका महत्वाची ठरते. स्वातंत्र्यानंतर यावर्षी तिसऱ्यांदा युवा धोरण मसुद्यावर मते घेतली जात आहेत. रोजगार, उद्योजकता, आरोग्य, युवा नेतृत्व, विकास, सामाजिक न्याय, फिटनेस, खेळ या विषयांवर युवकांनी सल्लामसलत करून जागृत मते मांडावीत, असे आवाहन अनुभव शिक्षा केंद्राचे गौतम कांबळे यांनी केले.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा धोरण २०२२ चा मसुदा जाहीर केला आहे. यामध्ये देशातील तरुणांच्या शिफारशी, दृष्टिकोन आणि मते मागवली आहेत. याच बाबींवर युवक- युवतींची मते जाणून घेण्यासाठी अनुभव शिक्षा केंद्राच्या माध्यमातून सायबर महाविद्यालयात दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागातर्फे चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रात तरुणांनी सहभाग घेत युवा धोरण मसुद्यात प्रकट मते नोंदवली.
सुरुवात मयुरेश माळी याने गायलेल्या समतेच्या वाटेने या गाण्याने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. डी. एन. वळवी यांनी केले. देशातील युवकांच्या वास्तवावर भाष्य करत युवकांनी युवकांसाठी सुचवलेला बदल देश बदल्यासाठी आवश्यक असल्याचे मत सायबरचे संचालक डॉ .एस. पी. रथ यांनी व्यक्त केले. समाजकार्य विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. दीपक भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. टी. व्ही. जी. शर्मा, डॉ. सुरेश आपटे, डॉ. बी. एन. पाटील, डॉ. कालिंदी रानभरे, डॉ. सोनिया रजपूत, डॉ. शुभांगी पाटील, प्रा. उर्मिला चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन रोहित कांबळे यांनी केले. ऋषीकेश राऊत यांनी आभार मानले.
- - - - -

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76761 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top