जिल्‍हा परिषद प्रशासकांना मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍हा परिषद प्रशासकांना मुदतवाढ
जिल्‍हा परिषद प्रशासकांना मुदतवाढ

जिल्‍हा परिषद प्रशासकांना मुदतवाढ

sakal_logo
By

जिल्‍हा परिषद लोगो

प्रशासक चव्हाण यांना
दोन महिने मुदतवाढ
ग्रामविकास विभागाने घेतला निर्णय
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १३ : जिल्‍हा परिषद व पंचायत समितींचा कार्यकाळ संपल्याने २० मार्चला प्रशासकांची नेमणूक केली. प्रशासकाचा कार्यभार संबंधित जिल्‍हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिला आहे. हा कार्यकाळ चार महिन्यांसाठी होता. मात्र ग्रामविकास विभागाने बुधवारी (ता.१३) हा कार्यकाळ दोन महिन्यांनी वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तत्‍पूर्वी अध्यक्ष, सभापतींच्या निवडी झाल्यातर हा कार्यकाळ संपुष्‍टात येणार आहे.
कोल्‍हापूरसह २५ जिल्‍हा परिषदांचा कार्यकाळ २० मार्च २०२२ ला संपला. मात्र ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम राहिल्याने निवडणुका न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जिल्‍हा परिषदेवर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची प्रशासक म्‍हणून नेमणूक केली. पंचायत समिती सभापती, उपसभापती व सरपंच समितीचे सभापती पद एकाचवेळी रिक्‍त झाले. त्याठिकाणीही प्रशासकांची नियुक्‍ती केली. प्रशासकाची नेमणूक ही २० मार्चपासून चार महिन्यांपासून पुढे केली होती. ही मुदत २० जुलैला संपत आहे. मात्र अजुनही निवडणुकीबाबत संभ्रम आहे. नुकतेच जिल्‍हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी काढण्यात येणारे आरक्षणही स्‍थगित केले आहे. त्यामुळे निवडणुका लांबण्याची शक्यता असल्याने प्रशासकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ दोन महिन्यांसाठी देण्यात आली आहे. तत्‍पुर्वी निवडणुका झाल्या तर ही मुदतवाढ संपुष्‍टात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76843 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..