गुरुपौणिमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरुपौणिमा
गुरुपौणिमा

गुरुपौणिमा

sakal_logo
By

35870, 35869
गुरू आहे सावली, गुरू आहे आधार!
धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, योगा-ध्यानातून सर्वांगीण आरोग्याचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः ‘‘गुरू आहे सावली, गुरू आहे आधार..गुरू आहे निसर्गात, नसे त्याला आकार..''’ असा गुरूमहिमा गात आज सर्वत्र गुरूपोर्णिमा पारंपरिक उत्साहात साजरी झाली. विविध मंदिरात सकाळपासूनच धार्मिक विधींना प्रारंभ झाला. दोन वर्षानंतर यंदा गर्दीबाबत कोणतेही निर्बंध नसल्याने मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. शाळा-महाविद्यालयांतही गुरूप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. मातृ-पितृ वंदनाच्या कार्यक्रमांवरही अनेक शाळांनी भर दिला.
दरम्यान, विविध ध्यान-योग वर्गांसह अध्यात्मिक संस्थांतर्फेही सामूहिक ध्यान, सामूहिक योगा आदी उपक्रमांवर भर दिला गेला. शहरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह दत्त भिक्षालिंग मंदिर, श्रीकृष्ण दत्त सरस्वती मंदिर, महाडिक वसाहत दत्त मंदिर, रूईकर कॉलनी, कोटीतीर्थ, जवाहरनगरातील स्वामी समर्थ मंदिर आदी ठिकाणी दिवसभर गर्दी राहिली.


राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल
संगीत शिक्षक महेश हिरेमठ यांनी गुरूमहिमा गीत सादर केले. तनाज नायकवडी रिफा मुल्ला, अनुष्का पाटील, प्राप्ती सुभेदार यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे, मुख्याध्यापक जे.आर.जोशी, एम. व्ही. मोहिते, बी. एस. कांबळे आदी उपस्थित होते. डी.व्ही.वाडीकर यांनी सूत्रसंचालन केले.

वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन
दळवी आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये गुरना विविध झाडे देवून वंदन झाले. संस्थेच्या सचिव अर्चना अबिंलठोक, प्राचार्य अजय दळवी, संजय गायकवाड, दिपक कांबळे, अभिजीत कांबळे, विद्यार्थी प्रतिनिधी शुभम साळोखे, प्रणोती चौगुले, अभिजीत गडकरी, ऋतुजा जाधव, रोहिणी कांबळे, रोहित गायकवाड आदी उपस्थित होते.

सहज सेवा ट्रस्ट, पतंजली योग वर्ग
सणगर गल्ली तालीम मंडळाच्या सभागृहात योगशिक्षक सुर्यकांत गायकवाड, अरविंद पोवार यांचा योग साधकांनी सत्कार केला. वीस वर्षांपासून पतंजली योगवर्गात योगसाधना शिकणाऱ्‍या साधकांनी गुरुबद्दलचे मनोगत व्यक्त केले. सुर्यकांत गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महानंदा माळी, मंगल गोडे, सुमन साळोखे, रुपा गायकवाड आदी उपस्थित होते.

गगनगिरी आश्रमात विविध कार्यक्रम
असळज : परमपूज्य गगनगिरी महाराज यांच्या तपोभूमीत गगनबावडा येथील गगनगिरी आश्रमातील गुरूपौर्णिमा सोहळ्यासाठी हजारो भाविकानी यंदा मुसळधार पावसातही उपस्थिती लावली. आश्रमात श्री मूर्तीस अभिषेक, पूजा, गुरूपाद्यपूजा, होमहवन, महाआरती, संतोष राऊत यांची भजन सेवा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरातील विविध धार्मिक विधी कार्यक्रम आश्रमाचे शांताराम पाटणकर, रमेश माने, संजय पाटणकर यांच्या हस्ते झाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76865 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top