
पोलिस वृत्त
फोटो
02590
बंदी आदेशाचा भंग; आठ वाहनांवर कारवाई
कोल्हापूर ः शहरात अवजड वाहनांना सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तरीही या आदेशाचा भंग करून शहरात प्रवेश करणाऱ्या आठ वाहन चालकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाई केली. त्यांच्यावर शाहूपुरी व राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले. शहरात अरूंद रस्ते आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न नित्याचा बनला आहे. त्यात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर बनला होता. सुरक्षीत वाहतुकीच्या दृष्टीने सप्टेंबर २०१९ मध्ये सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. त्या आदेशाचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम वाहतूक शाखेने आज हाती घेतली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
संशयित ताब्यात
कोल्हापूर ः मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रात्री संशयास्पदरित्या वावरणाऱ्या तरुणाला शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अपघातात एक जखमी
कोल्हापूर ः गांधीनगर येथे काल दुपारी झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला. किशोर छाबडा (वय ४५) असे जखमींचे नाव आहे. त्यांना आज सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर चौकीत झाली.
-
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76885 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..