जिल्‍हा परिषदेत ओबीसीच्या दोन जागा होणार कमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्‍हा परिषदेत ओबीसीच्या दोन जागा होणार कमी
जिल्‍हा परिषदेत ओबीसीच्या दोन जागा होणार कमी

जिल्‍हा परिषदेत ओबीसीच्या दोन जागा होणार कमी

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून..

जागा कमी होणार की वाढणार?
ओबीसींची लोकसंख्या; अधिकाऱ्यां‍यांसह लोकप्रतिनिधींमध्येही संभ्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १३ : राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी सर्व्हेक्षणाचा अहवाल सादर केला आहे. यात जिल्‍हानिहाय ग्रामीण व शहरी ओबीसींची माहिती सादर केली. जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील ओबीसींची लोकसंख्या २५.९० टक्‍के असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे किमान दोन जागा कमी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र सध्याची आकडेवारी ही जिल्‍हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाची सदस्य संख्या विचारात घेऊन केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य शासनाने जिल्‍हा परिषदेची सदस्य संख्या नउने वाढवली आहे. त्यामुळे नेमक्या जागा कमी होणार की वाढणार, याबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधींत मोठा संभ्रम असल्याचे सध्याचे चित्र आहे.
जिल्‍हा परिषदेची सध्याची सदस्य संख्या ही ६७ आहे. या संख्येनुसार २७ टक्‍के आरक्षण गृहित धरून विद्यमान सभागृहात ओबीसींना १९ जागांवर आरक्षण दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्व्हेक्षणात जिल्‍ह्यातील ग्रामीण भागातील ओबीसींची लोकसंख्या ही २५.९० टक्‍के असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागा कमी होणार आहेत. साधारणपणे २ जागा कमी होतील, असा अंदाज आहे. मात्र राज्य शासनाने काही महिन्यापुर्वी जिल्‍हा परिषदस सदस्य संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही सदस्य संख्या ६७ वरुन ७६ इतकी झाली आहे. परिणामी ओबीसी सदस्यांची संख्या वाढेल, असाही एक अंदाज आहे. जिल्‍ह्यातील ओबीसींची संख्या किती टक्‍के धरणार, वाढीव जागांचा विचार करुन ओबीसींची टक्‍केवारी ठरवली जाणार का, यावरच सदस्य संख्या अवलंबून असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76926 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top