राजू शेट्टी१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजू शेट्टी१
राजू शेट्टी१

राजू शेट्टी१

sakal_logo
By

३५७४१

...तर क्रांतिदिनी महामार्गावर चक्काजाम
माजी खासदार राजू शेट्टी; ५० हजार प्रोत्साहन अनुदानासाठी धडक मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली. शिंदे सरकार चुकीचे ट्वीट करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे प्रामाणिक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये प्रोत्साहन अनुदानाचे पन्नास हजार रुपये नऊ ऑगस्टपूर्वी जमा केले नाही तर क्रांतीदिनी पुणे-बंगळूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करत अकरा वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दिला. नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यना पन्नास हजार रुपये तात्काळ द्यावेत, पुढील हंगामात एकरकमी एफआरपी द्यावी व खतांचे दर कमी करून शेतीचे भारनियमन रद्द करावे यासाठी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान मुसळधार पावसात हजारो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.
मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत ते म्हणाले, ‘‘महाविकास आघाडी सरकारने प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटीची तरतूद केलेली रक्कम दिली नाही. रक्कम देताना विविध नियम व अटी घातल्यामुळे जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतकरी वंचित राहत होते. दरम्यान, सरकार अल्पमतात येत असताना यापैकी काही अटी शिथिल केल्या. पण त्याचा अधिकृत परिपत्रक काढले नाही. त्यामुळे ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. दरम्यान, हे दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले नाही तर अखर्चित रक्कम म्हणून शिंदे सरकार ही रक्कम इतर ठिकाणी वापरणार आहे. पण प्राण गेला तरीही तरतुद केलेल्या रकमेपैकी एक रुपयाही इतर ठिकाणी देणार नाही. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०१९ ला ज्यांना मदत मिळण्यास आमची काहीही हरकत नाही, असं त्यांनी ट्टिट केले आहे. पण यामध्ये अनेक शेतकरी वंचित राहणार आहेत. यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने काढलेल्या अद्यादेश आहे तसा जाहीर करा सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ मिळून जाईल.’’
यावेळी, प्रा. जालंदर पाटील, सावकार मादनाईक, अजित पवार आदी उपस्थित होते.


तरच ओके आहे असं समजू
नऊ ऑगस्टपर्यंत रक्कम जमा झाली तर सर्व काहीही ओकेच आहे, असे आम्हीही म्हणू नाहीतर ओके नाही. तुमच्यासोबत जे-जे आहेत, त्यांना रस्त्यावर फिरणंही मुश्‍किल करु असाही इशारा श्री शेट्टी यांनी दिला.

आम्ही विश्‍वास ठेवला...
उद्धव ठाकरे यांनी २०१९ पेक्षा जादा रक्कम शेतकऱ्यांना देऊ, आमच्यावर विश्‍वास ठेवा असे ट्वीट केले होते; पण प्रत्यक्षात नूकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ १३५ रुपये दिले. यापैकी अद्याप १५ रुपये येणेबाकी आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर आम्ही विश्‍वास ठेवला आणि त्यांचे विश्‍वासू त्यांना सोडून गेले अशीही टीका श्री शेट्टी यांनी केली.

* महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या अद्यादेश तयार आहे. तो राज्याच्या मुख्य सचिवांना जाहीर करण्यास सांगितला तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावावर पन्नास हजार रुपये मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही, पण शिंदे सरकारने तो जीआर अडवला असल्याचेही श्री शेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76974 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..