
आजरा ः साळगाव बंधारा पाण्याखाली
35834
साळगाव बंधारा पाण्याखाली
पेरणोलीसह सहा गावांचा संपर्क तुटला; सोहाळे मार्ग वाहतूक
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. १३ ः आजरा तालुक्यात पावसाची संततधार चालू असल्याने हिरण्यकेशी व चित्रा नदी पात्राबाहेर पडल्या आहेत. आज हिरण्यकेशीवरील साळगाव बंधारा पाण्याखाली गेला असून सोहाळे मार्गे वाहतूक वळवली आहे. पेरणोलीसह सहा गावांचा संपर्क तुटला आहे.
तालुक्यात आजअखेर ५७० मिमी. तर २४ तासांत सरासरी ५५ मिमी पाऊस झाला आहे. गवसे परिसरात अतिवृष्टी झाली असून ९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजपर्यंत सुमारे पंधरा घरांची पडझड झाली आहे. आजरा-पेरणोली, पेरणोली-वझरे, आजरा-पोळगाव यांसह विविध मार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे वाहतूक खोळंबत आहे. साळगाव (ता. आजरा) येथील हिरण्यकेशी नदीवरील साळगाव बंधारा पाण्याखाली गेला आहे. पेरणोली पंचक्रोशीसह भुदरगड तालुक्यातील कडगाव परिसरातील गावांचा आजऱ्याशी संपर्क तुटला आहे. सोहाळे मार्ग वाहतूक वळवली आहे.
बॅरिकेडस् लावून अडवला मार्ग
साळगाव (ता. आजरा) येथील बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडस् लावले आहेत. बंधाऱ्यावरून जाणारी वाहतूक बंद केली. आहे. या मार्गावर पोलिसांनी गस्त सुरू केली असून जीव धोक्यात घालून कोणी बंधाऱ्यावरून जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76977 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..