
गोडसाखर निवडणूक
‘गोडसाखर’चे रणांगण, असा लोगो वापरावा, ही विनंती.
तिसऱ्या दिवशी ३१ अर्ज दाखल
दोन माजी संचालकांचा समावेश : ६७ अर्जांची झाली विक्री
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. आज तिसऱ्या दिवशी ३१ अर्ज दाखल झाले. यात दोन माजी संचालकांचा समावेश आहे. दाखल अर्जांची संख्या आतापर्यंत ७६ वर पोचली आहे. तर आज ६७ अर्जांची विक्री झाली. येथील सहायक निबंधक कार्यालयात ही प्रक्रिया सुरू आहे.
गोडसाखर निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासूनच चढाओढ दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी २० अर्ज दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी ती संख्या २५ वर पोचली. हा चढता क्रम आजही कायम राहत ३१ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये माजी संचालिका क्रांतीदेवी कुराडे व भीमराव पाटील यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, पंचायत समितीचे माजी सभापती हिंदूराव नौकुडकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवप्रसाद तेली, ऐनापूरचे माजी सरपंच अॅड. दिग्विजय कुराडे, करंबळीचे माजी सरपंच दिलीप मोटे, प्रितम कापसे, मुगळीचे सरपंच बाळय्या स्वामी यांचा अर्ज दाखल केलेल्या अन्य प्रमुखांत समावेश आहे.
गटनिहाय आज दाखल झालेले अर्ज असे (कंसात आजपर्यंतचे एकूण अर्ज)- कौलगे-कडगाव गट- ३ (११), गडहिंग्लज-हनिमनाळ गट-६ (११), भडगाव-मुगळी गट-१ (७), नूल-नरेवाडी गट-४ (८), हरळी-महागाव गट-७ (१३), संस्था गट-१ (३), अनुसूचित जाती प्रवर्ग-२ (६), महिला राखीव-२ (७), इतर मागास प्रवर्ग-३ (६), विशेष मागास प्रवर्ग-२ (४).
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y76990 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..