इचल : उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार
इचल : उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार

इचल : उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार

sakal_logo
By

३५८८२

लेखकाची बांधिलकी सामान्य माणसांसोबत असावी
भारत सासणे; आपटे वाचन मंदिरातर्फे उत्कृष्ट साहित्य कृती पुरस्कारांचे वितरण
इचलकरंजी, ता. १३ : चांगले व श्रेष्ठ यातील फरक ओळखून लेखकाने श्रेष्ठ लेखन करावे. लेखकाची बांधिलकी सामान्य माणसांसोबत स्वत:शी असावी.साधनेचा काळ कोणता हे ओळखून स्वत:चा शोध घेतला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले. येथील आपटे वाचन मंदिराच्यावतीने आयोजित उत्कृष्ट साहित्य कृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ग्रंथालयाच्या बजाज सभागृहात आज सायंकाळी हा कार्यक्रम झाला. प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार संजय चौधरी (नाशिक) यांना प्रदान केला. याशिवाय अन्य पुरस्कारांचे यावेळी वितरण केले.
श्री. सासणे म्हणाले, ‘‘आपटे वाचन मंदिराच्या वतीने देण्यात येणारा इंदिरा संत पुरस्कारास राज्यात प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. लेखकाला मिळणाऱ्या पुरस्कारामुळे तो समृद्ध होतो. त्याला स्वत:चे स्थान निश्चित करता येत असल्याने पुरस्कार महत्वाचा आहे. लेखनाला व वाचनाला वय नसले तरी शिस्त आवश्यक आहे.’’
चौधरी म्हणाले, ‘‘इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार मिळवा अशी तीव्र इछा होती. हा पुरस्कार म्हणजे मोठा प्रसाद आहे. भारत सासणे यांच्या लेखनाचे वेड लागले असून त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे भाग्य आहे. पुरस्कारामुळे मला मोठी ऊर्जा मिळणार आहे.’’
उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्राप्त पांडुरंग डोंगरे यांनी ग्रंथालय म्हणजे ज्ञानरूपी पानपोई असून सेवानिवृत्ती नंतर २५५ कथा कादंबऱ्या वाचल्या असल्याचे सांगितले.
डॉ. एस. पी. मर्दा यांनी स्वागत तर प्रास्ताविक सुषमा दातार यांनी केले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी स्वानंद कुलकर्णी, काशिनाथ जगदाळे, मोहन पुजारी, राजेंद्र घोडके आदी उपस्थित होते. आभार माया कुलकर्णी यांनी मानले. सुजित सौंदत्तीकर व मिनाक्षी तंगडी यांनी सुत्रसंचालन केले.


यांचा झाला गौरव
लक्षणीय पद्य साहित्यकृती प्रतिभा सराफ (मुंबई), सारिका उबाळे (अमरावती), अनुपमा उजगरे (ठाणे), लक्षणीय गद्य साहित्यकृती प्रगती बाणखेले (मुंबई), उत्कृष्ट बाल साहित्यकृती एकनाथ आव्हाड (मुंबई) व स्थानिक साहित्यिक शामराव कुलकर्णी (इचलकरंजी) यांचा यावेळी गौरव केला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77062 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..