पूरपरिस्थितीसाठी शिवसेना सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूरपरिस्थितीसाठी शिवसेना सज्ज
पूरपरिस्थितीसाठी शिवसेना सज्ज

पूरपरिस्थितीसाठी शिवसेना सज्ज

sakal_logo
By

पूरस्थितीचा सामना
करण्यासाठी सज्ज
महापालिका प्रशासनाला शिवसेनेचे आश्वासन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः पूरस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी शिवसेनेने सर्व तयारी केली आहे. आपत्तीकाळात आम्ही प्रशासनाच्या मदतीला तत्परतेने येऊ, असे आश्वासन शहर कार्यकारिणीने महापालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे दिले.
निवेदनातील माहितीनुसार, पंचगंगा नदीची पातळी वाढली की शहराला पुराचा वेढा पडतो. अशा काळात प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनासाठी मर्यादा पडतात, म्हणूनच शिवसेना शाखेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केली आहे. यासाठी औषधे, अन्नपुरवठा शिवसेनेतर्फे केला जाईल. तसेच पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी दोन बोटींचीही व्यवस्था केली आहे. त्यामुळे पूरस्थिती उद्‍भवल्यास नागरिकांनी आणि प्रशासनाने शिवसेनेशी संपर्क साधावा. हे निवेदन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले. सुनील मोदी, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, मंजित माने, प्रतिज्ञा उत्तुरे, सागर साळोखे, राजू जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77071 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..