विद्यार्थी हेच केंद्रबिंदू मानणारी ओंकार शिक्षण संस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी हेच केंद्रबिंदू मानणारी ओंकार शिक्षण संस्था
विद्यार्थी हेच केंद्रबिंदू मानणारी ओंकार शिक्षण संस्था

विद्यार्थी हेच केंद्रबिंदू मानणारी ओंकार शिक्षण संस्था

sakal_logo
By

36009
राजन पेडणेकर


विद्यार्थी हेच केंद्रबिंदू मानणारी
ओंकार शिक्षण संस्था
रौप्यमहोत्सव साजरा केलेल्या येथील ओंकार शिक्षण प्रसारक मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून संस्थेची वाटचाल सुरू आहे. शैक्षणिक कार्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात ‘ओंकार’ अग्रेसर आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हाच यामागील उद्देश आहे.
गडहिंग्लजचे माजी नगराध्यक्ष राजन पेडणेकर यांनी १९८६ साली ओंकार शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेने जून १९९८ ला शिवाजी विद्यापीठाला संलग्नित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची सुरुवात केली. प्रारंभीच्या काळात हे महिला महाविद्यालय होते. पुढे विद्यार्थी व पालकांच्या अग्रवास्तव को-एज्युकेशन केले. सध्या या महाविद्यालयातून कला आणि वाणिज्य शाखेचे पदवी शिक्षण दिले जात आहे. तर सन २००४ मध्ये राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात केली.
शैक्षणिक कार्याबरोबर महाविद्यालय विविध सामाजिक उपक्रमात नेहमी सहभागी असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय सेवा योजना आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यशाबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत महाविद्यालयाचे विद्यार्थी नेहमीच चमकतात. बोर्डाच्या आणि विद्यापीठाच्या परीक्षेत नेहमी ९० टक्क्यांपेक्षा अधिक निकालाची परंपरा आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा संस्थेवरील विश्‍वास वृद्धिंगत होत आहे.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्था करत आहे. नॅकचे ‘बी’ मूल्यांकन मिळाले आहे. शिवाजी विद्यापीठाचा गृहशास्त्र पदवी अभ्यासक्रम शिकणारे या परिसरातील एकमेव महाविद्यालय आहे. शिवाय राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मराठी, इंग्रजी या विषयातून पदवीचे शिक्षण दिले जाते. विविध करिअर ओरिएंटेड अभ्यासक्रमही नाममात्र शुल्कात शिकवले जातात. महाविद्यालयात नियमित शिक्षण घेऊ न शकणाऱ्यांसाठी दूरशिक्षण विभागातून पदवी व पदव्युत्तर शिक्षणांची सुविधा उपलब्ध आहे. भविष्यात विज्ञान व तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. संस्थेचे अध्यक्ष राजन पेडणेकर व प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी सेवा बजावत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77172 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top