रोजगार निर्मितीचा ध्यास घेतलेले एस. एन. शिक्षण समुह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोजगार निर्मितीचा ध्यास घेतलेले एस. एन. शिक्षण समुह
रोजगार निर्मितीचा ध्यास घेतलेले एस. एन. शिक्षण समुह

रोजगार निर्मितीचा ध्यास घेतलेले एस. एन. शिक्षण समुह

sakal_logo
By

36000
सूर्यकांत नाईक

रोजगार निर्मितीचा ध्यास घेतलेले
एस. एन. शिक्षण समूह

लीड
गडहिंग्लज येथे सतरा वर्षांपासून न्यू काळभैरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. एन. कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या कॉलेजच्या माध्यमातून अनेक गरजू व गरीब विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना देश-परदेशात नोकरीची संधी दिली. राजकीय किंवा अन्य कोणताही पाठिंबा नसताना संस्थेचे रोजगानिर्मितीचे कार्य अखंडित सुरू असल्याचे संस्थापक सूर्यकांत ऊर्फ भय्या नाईक यांनी सांगितले.
------------------
श्री. नाईक यांनी सर्वसामान्यांना परवडेल, अशा माफक शुल्कात कॉलेजसाठी आवश्यक साहित्य पुरवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आहे. नापास विद्यार्थ्यांनाही इतर पर्याय उपलब्ध केले. त्यांना प्रवेश घेणे सुलभ करून दिले. यामुळे हे विद्यार्थी नव्या जोमाने आपले भविष्य उज्ज्वल करण्यास प्रयत्नशील आहेत. एका पत्र्याच्या शेडमध्ये हे कॉलेज सुरू झाले. आपली संपत्ती गहाण ठेवून त्यांनी कॉलेजची उभारणी केली. आज कॉलेजची स्वतःची इमारत असून त्यात आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अत्याधुनिक किचन लॅब, डिजिटल क्लासरूमसह स्टाफ व व्यक्तिमत्त्व विकासासाठी तज्ज्ञ सेफकडूनही मार्गदर्शन केले जाते. निवासासह इतर सुविधाही संस्था देत आहे.
समूहामध्ये सुरुवातीपासून हॉटेल मॅनजमेंट कोर्स सुरू केले. या कोर्सला शंभर टक्के नोकऱ्या उपलब्ध असल्याने तो चांगला चालत आहे. केटरिंग अ‍ॅन्ड रेस्टॉरंट मॅनेजमेंट हा दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्सही सुरू केला. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना हा कोर्स पूर्ण करण्यासह बारावीची मान्यताही मिळते. या पदवी अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. व्हीआयपी सर्व्हिसेस, इव्हेंट मॅनेजमेंट, फूड कोर्टची संस्था, पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट, एअरलाइन किचन, क्रूझ लाईन, इंडियन आर्मी आणि इंडियन नेव्ही, केटरिंग सर्व्हिसेस आदी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या कॉलेजचे अनेक विद्यार्थी सौदी अरेबिया, कुवेत, सिंगापूर, दुबई, मलेशिया, फ्रान्स, दक्षिण आफ्रिकेत कार्यरत आहेत. त्याचा संस्थेला अभिमान आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत शंभर टक्के रोजगार उपलब्ध झाल्याने पालकही समाधानी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचाही ओढा या विभागाकडे आहे. यामुळेच दरवर्षी प्रवेश फुल्ल होतात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77174 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..