तालुका कृषी अधिकारी जगताप यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तालुका कृषी अधिकारी जगताप यांचा सत्कार
तालुका कृषी अधिकारी जगताप यांचा सत्कार

तालुका कृषी अधिकारी जगताप यांचा सत्कार

sakal_logo
By

36046

कृषी अधिकारी जगताप यांचा
निवृत्तीनिमित्त सत्कार
चंदगड, ता. १४ ः येथील तालुका कृषी अधिकारी सुनील जगताप यांचा निवृत्तीबद्दल सपत्नीक सत्कार केला. उपविभागीय कृषी अधिकारी भाग्यश्री पवार अध्यक्षस्थानी होत्या. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात कार्यक्रम झाला. किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले. पवार यांच्या हस्ते जगताप यांचा सपत्नीक सत्कार केला. पवार म्हणाल्या, ‘जगताप यांनी ३३ वर्षे कृषी विभागात काम केले. यापुढील काळातही त्यांनी आपले शेतीविषयक ज्ञान सामाजिक सेवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत राहावे.’ सत्काराला उत्तर देताना जगताप म्हणाले, ‘राज्यातील विविध भागात शेती अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अनेक शेतकऱ्यांशी संपर्क आला. कृषीसारख्या पायाभूत क्षेत्रात इतकी वर्षे सेवा करता आली याचे समाधान आहे.’ वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे, कोषागार अधिकारी सुनील रुकडीकर, कृषी अधिकारी अनिल फोंडे, माधुरी सावंत भोसले, मंडल कृषी अधिकारी अक्षय गार्डे, उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77201 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..