ऊस कोलमडला, कारल्यांचे वेल जमिनीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऊस कोलमडला, कारल्यांचे वेल जमिनीवर
ऊस कोलमडला, कारल्यांचे वेल जमिनीवर

ऊस कोलमडला, कारल्यांचे वेल जमिनीवर

sakal_logo
By

35990
--------------------------------

ऊस कोलमडला, कारल्यांचे वेल जमिनीवर
---
अतिपावसाचा परिणाम; बागिलगे येथील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांना फटका
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १४ ः बागिलगे (ता. चंदगड) येथील ज्ञानेश्वर पाटील यांच्या ऊस शेतीला अतिपावसाचा फटका बसला. सरीत पाणी तंबल्याने मुळे कमकुवत होऊन वाऱ्याने पीक एका बाजूला कोलमडले. पडलेला ऊस मजुरांच्या सहाय्याने एकत्रीत बांधण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, उसात कारल्याचे आंतरपीक घेतले होते. ऊस कोलमडल्याने कारल्याचे वेलही जमिनीला टेकले आहेत.
पाटील हे प्रगतिशील शेतकरी असून, शेतात सातत्याने विविध प्रयोग करीत असतात. काही वर्षांपासून त्यांनी बटाट्याचे आंतरपीक घेतले आहे. त्याचा फायदा उसाच्या मशागतीला होतो. पीक चांगले येते. शिवाय, बटाट्यामुळे अतिरिक्त उत्पादन मिळते. यावर्षी त्यांनी एक एकरात बटाट्याचे, तर अर्ध्या एकरात कारल्याचे पीक घेतले आहे. बटाटा मेमध्येच काढला होता. मात्र, चार दिवस झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी सरीत तुंबल्याने उसाची मुळे सैल झाली. वाऱ्याच्या झोताने ऊस कोलमडला. तशाच स्थितीत ठेवल्यास वाढीवर परिणाम होत असल्याने पाटील यांनी मजूर घेऊन तीन सरीतील पडलेला ऊस एकत्र करून बांधण्याला सुरुवात केली आहे. कारल्याच्या वेलांनाही बांबूचा आधार देऊन उभे करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, कारल्याची सध्या तोडणी सुरू असून त्यातूनही अपेक्षेपेक्षा चांगले उत्पन्न मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77202 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..