
कृष्णा डेळेकर यांना वनपालपदी पदोन्नती
36045
कृष्णा डेळेकर यांना वनपालपदी पदोन्नती
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १४ : येथील चंदगड परिक्षेत्र वनपालपदी कृष्णा डेळेकर यांनी पदभार स्वीकारला. वनरक्षक पदावरून त्यांना ही पदोन्नती मिळाली. २००६ मध्ये त्यांनी वनरक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. दाजीपूर, गडहिंग्लज, आजरा येथे पंधरा वर्षे सेवा बजावली. दरम्यान, येथील कार्यालयात वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले यांच्या उपस्थितीत त्यांनी पदभार स्वीकारला. काही महिने हे पद रिक्त होते. वनपाल अनिल वाजे यांनी कानूरसह चंदगडची जबाबदारी पार पाडली होती. डेळेकर यांचा भोसले यांच्याहस्ते सत्कार झाला. उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला, सचिन बांदिवडेकर, विठोबा गावडे, शब्बीर मुल्ला, सलमान मुल्ला, बाळू मुल्ला, ईस्माईल मुल्ला, अरुण गवळी, धोंडीबा तेजम, संजू मोरे यांनीही स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. वनपाल भरत निकम, वनरक्षक सागर पोवार, कैलास सानप, खंडू ताकखडे, सचिन होगले, सुषमा सरवदे, अस्मिता घोरपडे, कल्पना पताडे, लेखापाल संजय गावडे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77203 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..