करिअर स्वप्नपूर्तीसाठी डॉ. ए. डी. शिंदे टेक्नीकल संकूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करिअर स्वप्नपूर्तीसाठी डॉ. ए. डी. शिंदे टेक्नीकल संकूल
करिअर स्वप्नपूर्तीसाठी डॉ. ए. डी. शिंदे टेक्नीकल संकूल

करिअर स्वप्नपूर्तीसाठी डॉ. ए. डी. शिंदे टेक्नीकल संकूल

sakal_logo
By

36033
अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे
--------------
36034


करिअरच्या स्वप्नपूर्तीसाठी
डॉ. ए. डी. शिंदे टेक्निकल संकुल

लीड
भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील निसर्गरम्य गुड्डादेवी डोंगर परिसरात उभारलेले डॉ. ए. डी. शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांच्या तंत्रशिक्षणाची स्वप्नपूर्ती करणारे संकुल म्हणून नावारूपाला आले आहे. सुसज्ज इमारती, अद्ययावत सुविधा, तज्ज्ञ प्राध्यापक वर्गामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी हे संकुल आधारवड ठरले आहे. संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, सचिव प्रा. स्वाती कोरी व सल्लागार महेश कोरी यांच्या मार्गदर्शनाने संस्थेची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरू आहे.
- शरद किल्लेदार, डॉ. ए. डी. शिंदे विद्या संकुल
----------------------
काळानुरूप होणारे बदल स्वीकारून ही संस्था नेहमी सामाजिक बांधिलकीसह औद्योगिक विश्‍वात होणारे बदल व त्यानुसार मनुष्यबळ विकसित करण्यासाठी एमएसबीटीई व शिवाजी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने संस्था शैक्षणिक मार्गक्रमण करीत आहे. माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी २००८ पासून गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांची गरज ओळखून उच्च दर्जाचे शिक्षण घेता यावे म्हणून पहिल्यांदा तंत्रनिकेतन व पुढे २०१४ मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थापना शिखर संस्था असलेल्या अखिल भारतीय तंत्रविज्ञान परिषद, नवी दिल्ली यांच्या मान्यतेने केली.
गडहिंग्लज विभागात यापूर्वी गोरगरीब, शेतकरी कुटुंबातील हुशार व जिज्ञासू विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. उत्तम गुणवत्ता असूनही तरुण या शिक्षणापासून वंचित होते. याच तळमळीपोटी शिंदे यांनी ज्येष्ठ बंधू डॉ. ए. डी. शिंदे यांच्या नावे भडगावात गुड्डाई देवीच्या डोंगर पायथ्याशी अद्ययावत संकुल उभे केले. गेली १४ वर्षे अनेक विद्यार्थी या संकुलात शिक्षण घेऊन विविध कंपन्या व शासकीय नोकरीत उच्च पदावर कार्यरत आहेत. अनेक विद्यार्थी व्यावसायिक बनले आहेत.
ज्या उद्देशाप्रती संस्थेची स्थापना झाली, तो हेतू सफल होताना पाहावयास मिळतो आहे, हा आनंद संस्था सचिव प्रा. स्वाती कोरी नेहमी व्यक्त करीत असतात. स्पर्धेच्या युगात चढ-उतारांना सामोरे जावे लागते. यासाठी चढ-उतारांचे समायोजन दैनंदिन जगण्यात करता यावे, यासाठी विशेष भर दिला पाहिजे आणि त्यासाठीच संस्था सातत्याने विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व धडे देत आली आहे. भविष्यात विभागातील गरज ओळखून विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक दालने सुरू करण्याचा मानस संस्थेचा आहे. अलीकडील काही वर्षांपासून संस्थेने रचना पब्लिक स्कूलची सुरुवात केली आहे. नर्सरी ते बारावीपर्यंतच्या या विद्याशाखेलाही चांगला प्रतिसाद आहे. संस्थेत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी फ्रीशिप, स्कॉलरशिप, पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेचा लाभ दिला जातो. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचा ओढा या संस्थेत शिक्षण घेण्याकडे वाढत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77225 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top