
निधन वृत्त
३६१८८
विमल जाधव
कोल्हापूर ः येथील सौ. विमल शंकरराव जाधव (वय ७७) यांचे निधन झाले. केएमटीचे निवृत्त परचेस ऑफिसर शंकरराव भाऊसो जाधव यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती, चार मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या (ता. १५) आहे.
२३४२
पांडुरंग चौगले
गारगोटी : येथील पांडुरंग नारायण चौगले (वय ८१) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. सचिन चौगले यांचे ते चुलते होत. रक्षाविसर्जन उद्या (ता. १५) आहे.
३६१८२
लक्ष्मीबाई पाटील
वडणगे ः चावडी गल्ली येथील श्रीमती लक्ष्मीबाई भीमराव पाटील (वय ८४) यांचे निधन झाले. पोलिस कर्मचारी प्रकाश व भाऊसाहेब पाटील, वडणगे कुरण मंडळ सदस्य विजय पाटील यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन उद्या (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता आहे.
३६१४७
विजया पाटील
कोल्हापूर ः इंद्रजित कॉलनी (जाधववाडी) तील रहिवासी विजया दत्तात्रय पाटील (वय ६५) यांचे निधन झाले. रक्षाविर्सजन उद्या शुक्रवारी (ता. १५) ला पंचगंगा स्मशान भूमी येथे सकाळी ९ वाजता आहे.
३६१२४
वासंती दिंडे
कोल्हापूर : कसबा बावडा लाईन बाजार येथील वासंती विश्वासराव दिंडे (वय ७८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, मुलगी सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १७) आहे.
०२५९२
शंकर दळवी
कळे : वेतवडेपैकी खामणेवाडी (ता. पन्हाळा) येथील शंकर पांडुरंग दळवी (वय ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
२५९४
सदाशिव पाटील
कळे : सावर्डे तर्फ असंडोली (ता. पन्हाळा) येथील सदाशिव आकाराम पाटील (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १५) आहे.
०२५९६
सुशीला पाटील
कळे : येथील श्रीमती सुशला पांडुरंग पाटील (वय ७९) यांचे निधन झाले. पाटबंधारे विभागातील कालवा निरीक्षक संजय पांडुरंग पाटील व ‘कुंभी’चे कर्मचारी सुनील पाटील यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.१५) आहे.
३६१५२
गंगूबाई निल्ले
कोल्हापूर ः शनिवार पेठेतील गंगूबाई सदाशिव निल्ले (वय ९६) यांचे निधन झाले. त्या वीरशैव लिंगायत समाजाच्या अक्कमहादेवी महिला मंडळाच्या संस्थापक सदस्या होत्या. त्यांच्या मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
२०११
गुलाबहुसेन मोमीन
पाचगाव ः : आर. के. नगरातील निवृत्त शिक्षक गुलाबहुसेन अब्दुलमजिद मोमीन(वय ८४) यांचे निधन झाले. यादववाडी, उचगाव शाळेचे शिक्षक रियाजअहमद मोमीन यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.
३६११४
यशवंत इंगवले
कोल्हापूर : शिवाजी पेठ, ताराबाई रोड येथील यशवंत कृष्णा इंगवले (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ट्रॅक्टर मिस्त्री म्हणून ते प्रसिद्ध होते. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १७) आहे..
००५८८
दिगंबर मेथे
प्रयाग चिखली ः केर्ले (ता. करवीर) येथील दिगंबर शंकर मेथे (वय ४७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १५) आहे.
६९४४
जयसिंग गायकवाड
घुणकी ः नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील जयसिंग गोविंद गायकवाड (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. १५) आहे.
३५८७९
मारुती वडगावे
गडहिंग्लज : शहरातील संभाजीनगर परिसरातील निवृत्त शिक्षणाधिकारी मारुतीराव धोंडिराम वडगांवे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे, पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
१५६७
आक्काताई मोरे
पिंपळगाव ः येथील श्रीमती आक्काताई बापूसो मोरे (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77349 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..