आजरा ः साळगाव शाळेला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः साळगाव शाळेला भेट
आजरा ः साळगाव शाळेला भेट

आजरा ः साळगाव शाळेला भेट

sakal_logo
By

36130

साळगावमध्ये पूरस्थितीची पाहणी
आजरा ः साळगाव (ता. आजरा) येथील प्राथमिक शाळेच्या कोसळलेल्या संरक्षक भिंतीची प्रभारी गटविकास अधिकारी सुधीर खोराटे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव व विस्तार अधिकारी पी. जी. चव्हाण यांनी पाहणी केली. त्याचबरोबर शाळे नजीक हिरण्यकेशी नदी वहात असून गतवर्षी महापुरात शाळेचे नुकसान झाले आहे. मुख्याध्यापिका मंजिरी यमगेकर यांनी पूरस्थितीची माहिती दिली. संरक्षक भिंत बांधकामासाठी निधी मिळावा याची मागणी केली व निवेदनही दिले. तातडीने कार्यवाही करणार असल्याचे खोराटे यांनी सांगितले. पोलिसपाटील सुरेश पाटील, अध्यापक संजय मोहिते, गीता जंगम, सत्यवान सोन्ने, निवृत्ती मिटके आदी उपस्थित होते. दरम्यान, हिरण्यकेशी व चित्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. साळगाव बंधारा पाण्याखाली आहे. तालुक्यात आज सरोळी (ता. आजरा) येथील कासुबाई बाळू कांबळे व बेलेवाडी हुबळगी येथील श्रीपती जानू भोईटे यांच्या घरांची पडझड झाली आहे. सुमारे पस्तीस हजारांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात शेती कामांना वेग आला असून भात रोप लावणीचे काम सुरु आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77357 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..