‘सीबीएसई’ची मुहूर्तमेढ करणारे साई इंटरनॅशनल स्कूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सीबीएसई’ची मुहूर्तमेढ करणारे साई इंटरनॅशनल स्कूल
‘सीबीएसई’ची मुहूर्तमेढ करणारे साई इंटरनॅशनल स्कूल

‘सीबीएसई’ची मुहूर्तमेढ करणारे साई इंटरनॅशनल स्कूल

sakal_logo
By

36142
सतीश पाटील

गडहिंग्लजला ‘सीबीएसई’ची मुहूर्तमेढ करणारे
साई इंटरनॅशनल स्कूल

लीड
गडहिंग्लज, आजरा, चंदगड व कागल तालुक्यांतील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘सीबीएसई’ बोर्डाच्या शिक्षणाचे दरवाजे पहिल्यांदा साई एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी उघडले. कॉर्पोरेट इमारतीलाही लाजवेल, अशा सुसज्ज इमारतीत एकाच छताखाली नर्सरीपासून बारावीपर्यंतच्या शिक्षणाची गंगा आणली. ‘सीबीएसई’चा अखंड ज्ञानयज्ञ सुरू करण्यात साई इंटरनॅशनल स्कूलने आघाडी घेतली आहे.
-------------------
शेंद्रीच्या (ता. गडहिंग्लज) माळावर श्री. पाटील यांनी शिक्षणाचे नंदनवन फुलविले आहे. अल्पावधीतच गडहिंग्लजच्या शिक्षण क्षेत्रात साई स्कूलने आपला ठसा उमटविला. पूर्वी केवळ ‘सीबीएसई’ बोर्डाचे दहावीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध होते. त्यानंतरच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना स्टेट बोर्डाकडे जावे लागायचे. अचानक बदलणाऱ्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी गोंधळून जायचे. यामुळे पाटील यांनी ‘सीबीएसई’ बोर्डाचेच अकरावी व बारावी विज्ञान विभाग सुरू केले. स्टेट बोर्ड अभ्यासक्रमाचे अकरावी व बारावीचेही वर्ग सुरू केले.
उच्चशिक्षित व अनुभवी केरळ, हैदराबादचे शिक्षकवृंद हे या स्कूलचे वैशिष्ट्य आहे. विविध सण, खेळ, पर्यावरण संरक्षण, शिक्षक, महिला दिन आदी उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधण्याचेही स्कूलचे ध्येय आहे. म्हणून पालकांची पहिली पसंती ‘साई’ला मिळते. बोलक्या भिंती, ई लर्निंग, प्रदूषणविरहित वातावरण, सीसीटीव्ही कॅमेरे, विस्तीर्ण पटांगण, खेळाचे प्रशिक्षण, कौशल्यपूर्ण शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा प्रयोगशाळा, एमएससीआयटी प्रशिक्षण केंद्रासह अटल टिंकरिंग लॅबची सुविधा आहे.
ऑलिंपियाडचे एसओएफ, इंडियन टॅलेंट व अबॅकस स्पर्धा परीक्षेत स्कूलचे १०० टक्के विद्यार्थी यशस्वी झाले. सध्या दीपाली कोरडे यांच्यावर प्राचार्यपदाची जबाबदारी आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी शिक्षकांच्या प्रयत्नातून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडत आहेत. लॉकडाउनमध्ये शाळा बंद असताना स्कूलने नियमित ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवले. योगा, जेवण बनविणे, खेळ, चित्रकला, तबलावादन, शेतीमाल विक्री कौशल्य, केक बनविणे, व्यायाम, पक्ष्यांना पाणी देणे, झाडांची निगा आदींचे धडेही विद्यार्थ्यांना दिले जातात.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77378 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..