
शहर पाऊस बातमी
36128, 36126
पंचगंगेचे पाणी आखरी रस्त्यावर
कोल्हापूर, ता.१४ ः पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी आज गंगावेश ते पंचगंगा स्मशानभूमी रस्त्यावर आले. गायकवाड वाड्यापर्यंत पाणी आले आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला. दिवसभर शहरात कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरूच होता. त्यामुळे नदीकाठी राहाणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोल्हापुरकरांचा आजचा दिवसही सूर्यनारायणाच्या दर्शनाने नव्हे तर पावसाच्या सरींनीच उगवला. रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होतीच. सकाळी ६ ते ८ या वेळेत दमदार पाऊस पडला. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात दिवसभर पाऊस सुरूच होता. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. सायंकाकाळी ४ वाजेपर्यंत राजराम बंधारा येथे नदीची पातळी ३७ फूट ४ इंच इतकी होती. पंचगंगा नदीचे पाणी दोन दिवसापूर्वी पत्राबाहेर पडले आहे. आज गंगावेश ते पंचगंगा स्मशानभूमी या आखरी रस्त्यावर पाणी आले. गायकवाड वाड्याच्या भिंतीला पाणी लागले आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने पंचगंगा तालीम आणि शिवाजी पूल चौक येथे बॅरिकेट्स लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. येथे पोलिसांनी बंदोबस्तही लावला आहे. अद्याप जून्या शिवाजी पुलावरून वाहतूक सुरू आहे. नदीचे पाणी आपसापच्या परिसरात पसरल्याने पूरजन्यस्थिती उद्भवली आहे. नदीचे हे अथांग रुप पाहाण्यासाठी नागरिक येथील पिकनिक पॉइंटच्या बागेत येत आहेत. कसबा बावड्यातील राजाराम बंधारा परिसरात पूर पाहण्यासाठी नागरिकींनी गर्दी केली होती. दरम्यान आज पावसात सातत्य असल्याने पूरग्रस्त भागात नागरिकांना सतर्क राहाण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची गस्त या भागात सुरू आहे.
चौकट
झाड उन्मळून पडले
येथील रुइकर कॉलनी भागात एक झाड उन्मळून पडले. याबाबतची वर्दी येथील नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमनच्या जवानांनी झाड कापून बाजूला केले. यामध्ये कोणतेही नुकसान झाले नाही. पापाची तिकटी येथे शॉर्टसर्कीट होण्याची घटना घडली. मात्र, यात कोणतेही नुकसान झाले नाही.
चौकट
गाडीने घतला पेट
शिवाजी विद्यापीठासमोर कोल्हापूर-कागल रस्त्याजवळ एका चारचाकी गाडीने अचानक पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथे जावून ही आग आटोक्यात आणली. दुपारी २.१५ वाजता ही घटना घडली. यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, गाडीचे सुमारे ४० ते ५० लाखांचे नुकसान झाले. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77386 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..