महाडीक बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाडीक बातमी
महाडीक बातमी

महाडीक बातमी

sakal_logo
By

अतिवृष्टीमुळे शाळांना
१६ जुलैपर्यंत सुटी द्या
खासदार महाडिक यांचे निवेदन
कोल्हापूर, ता. १४ ः जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येण्याची शक्यता आहे. पाऊस आणि थंड हवामान यांचा विपरीत परिणाम होऊन विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मुले पुराच्या पाण्यातून शाळेला येतात. या सर्व बाबींचा विचार करून जिल्ह्यातील शाळांना १४ ते १६ जुलैदरम्यान सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सद्य:स्थितीत ६० बंधारे पाण्याखाली गेले असून, अनेक मार्ग बंद झाले आहेत. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पाऊस आणि थंड हवा याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर होऊ शकतो. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यातून वाट काढत, विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. पूरस्थितीमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका पोहोचू नये, यासाठी खबरदारी म्हणून आजपासून तीन दिवस जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी द्यावी, असे या निवेदनात श्री. महाडिक यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77403 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top