
कोरगावकर हायस्कूल
36175
कोल्हापूर ः कोरगावकर हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करताना प्राचार्या डॉ. राणे, प्रा. डॉ. मोरे व अन्य.
कोरगावकर’मध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप
कोल्हापूर : येथील आंतरभारती शिक्षण मंडळ संचालित कोरगावकर हायस्कूलमध्ये मार्केटयार्ड येथील महिला शिक्षण शास्त्र महाविद्यालयामार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अस्मिता राणे, प्रा. वंदना मोरे यांनी आपल्या प्रतिनिधींसह गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी स्वागत केले पर्यवेक्षिका वृषाली कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा हेतू सांगितला. सहशिक्षक सुनील साजणे यांनी आभार मानले. सुरेखा पोवार-मोरबाळे, शिक्षक प्रतिनिधी प्रमिला साजणे, सरिता शिंदे, हेमलता पाटील, आर. पी. मोरे उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77432 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..