कोल्हापूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर

sakal_logo
By

36190

शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर परिसरात
आमदार जाधव यांची पाहणी

कोल्हापूर, ता. १४ : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूरातील शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर परिसराला महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शाहूपुरी व व्हिनस कॉर्नर परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. यामुळे यावर्षी संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाय योजना करण्यात आल्यात. या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी समस्या जाणून घेतल्या.
आमदार जाधव यांनी शाहूपुरीरीतील पंचमुखी गणेश परिसर, कुंभारगल्ली, रिलायन्स मॉलच्या मागील परिसरातील नागरिकांनी कचरा उठाव, औषध फवारणी व नालेसफाई बद्दलच्या तक्रारी सांगितल्या. औषधाची फवारणी करा व नाला साफ करताना बाजूला ओढून लावलेला कचरा भरून न्या अशा सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
व्हिनस कॉर्नरच्या मागील बाजूस असलेल्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. या कचऱ्यामुळे पाणी रस्त्यावर येण्याची व नागरी वसाहतीमध्ये शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो कचरा त्वरित काढून घ्यावा अशी सूचना आमदार जाधव यांनी दिली.गाडीअड्डा येथील प्रश्‍नांबाबत प्रशासनाबरोबर बैठक घेण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.घरात पाणी शिरण्याचे वाट न पाहता, स्थलांतरित व्हा अशा सूचना आमदार जाधव यांनी सुतारवाडा परिसरातील नागरिकांना दिल्या.
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, पूजा नाईकनवरे, अमर समर्थ, रमेश पुरेकर, अमर देसाई, संभाजी पवार, रमेश नलवडे, महापालिकेचे बाबुराव दबडे, स्वप्नील उलपे, उमेश बागुल, अग्निशमन दलाचे तानाजी कवाळे, मनीष रणभिसे, आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77461 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..