
शिवसह्याद्रीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
36275
दुंडगे : शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपप्रसंगी विनायक इंदूलकर, विनो येसादे, शाहीद खणदाळे, अवधूत परीट आदी.
‘शिवसह्याद्री’तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
गडहिंग्लज : येथील शिवसह्याद्री प्रतिष्ठानतर्फे तालुक्यातील दुंडगे, हेब्बाळ येथील शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वही, पेन, पुस्तके दिली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य कुटूंबातील मुलांचे शिक्षण अवघड झाले आहे. ही गरज लक्षात घेऊन त्यांना ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबविण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष विनायक इंदूलकर यांनी सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष विनोद येसादे, तालुकाध्यक्ष शाहीद खणदाळे, तालुका उपाध्यक्ष अवधूत परीट, शहरप्रमुख संघराज विटेकरी, शहर उपप्रमुख सतीश भोगाणे, आजरा तालुकाध्यक्ष रोहन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद परीट आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77532 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..