गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

कंकणादेवी संस्थेची शंभर टक्के वसुली
नूल : शिंदेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील श्री कंकणादेवी विकास सेवा संस्थेने ३० जून अखेर सभासद पातळीवर शंभर टक्के कर्ज वसुलीची परंपरा यंदाही कायम राखली, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष भाऊराव कदम व सचिव हबीब काजी यांनी दिली. संस्थेने सभासदांना मध्यम मुदत कर्जापोटी सात लाख ४३ हजार ७०० रुपये, तर अल्प मुदत पीक कर्जापोटी ३५ लाख ७३ हजार ८०० रुपये कर्ज वाटप केले होते. या सर्व कर्जाची शंभर टक्के वसुली झाली. यासाठी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, विभागीय अधिकारी श्री. कागवाडे, बँक निरीक्षक शामराव पाटील यांचे सहकार्य मिळाले. उपाध्यक्ष सुनील आरबोळे, प्रकाश कदम, परशराम घुगरे, सुखदेव घुगरे, वसंत शिंदे, सुभाष कर्णेकर, दीपक पाटील, जोतिबा कर्णेकर, जयश्री कर्णेकर, कल्पना भांबर, उपसरपंच दीपक घुगरे यांचे सहकार्य मिळाले.
-----------------
प्रेमालय फाउंडेशनतर्फे गुरुपौर्णिमा
गडहिंग्लज : सांगलीच्या प्रेमालय फाउंडेशनच्या येथील शाखेतर्फे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. महायोगी डॉ. प्रशांत फालक प्रमुख पाहुणे होते. अशोक देसाई यांनी प्रार्थना केली. डॉ. फालक यांचे पाद्यपूजन झाले. डॉ. फालक यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर स्वत:च स्वत:चे गुरू बनून आयुष्य आनंदी व यशस्वीपणे जगावे, असे आवाहन केले. गुरुलिंग खंदारे यांनी प्रास्ताविक केले. पद्मजा गावडे यांनी सूत्रसंचालन केले. विठ्ठल मोरे यांनी आभार मानले. निवास सदामते, अमित चव्हाण, नीलम जाधव, गीता जाधव यांची भाषणे झाली. डॉ. नागेश पट्टणशेट्टी, अनुजा बेळगुद्री, सचिन शिंदे, बाळासाहेब बडदारे, शारदा आजरी, संतोष गुंडप, सुनील कोळी, तानाजी डोंगरे उपस्थित होते. विक्रम महाजन, शिवगोंडा खापरे, शंकर खाडे, अशोक देसाई यांनी नियोजन केले.
----------------
36298
गडहिंग्लज : गुरुपौर्णिमेनिमित्त महात्मा बसवेश्‍वर पुतळ्याला अभिवादन करताना जयंती उत्सव समिती व वीरशैव समाज सेवा मंडळाचे पदाधिकारी.

गुरुपौर्णिमेनिमित्त बसवेश्‍वरांना अभिवादन
गडहिंग्लज : महात्मा बसवेश्‍वर चौक येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विश्‍वगुरू महात्मा बसवेश्‍वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. बसवेश्‍वर जयंती उत्सव समिती व वीरशैव समाज सेवा मंडळ यांचेतर्फे वर्षभर विविध कार्यक्रम घेण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सुरेश कोळकी, दयानंद पाटील, बसवराज आजरी, महेश आरभावी, प्रशांत हिरेमठ, सचिन घुगरे, प्रवीण मेनशी, पापू रामणकट्टी, सचिन गाडवी, गुरुनाथ घुगरे, सुनील हत्ती, प्रीतम कापसे, मनीष कोले यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
-------------------
36299
कुंबळहाळ : फळ पीक लागवडीची शेतकऱ्यां‍ना माहिती देताना रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या.

कुंबळहाळमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन
नूल : कुंबळहाळ (ता. गडहिंग्लज) येथे ग्रामीण व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील कृषिकन्यांनी फळ पिकासाठी खड्डे खोदणे आणि भरणे यावर प्रात्यक्षिक सादर करून दाखवले. प्रा. बी. आर. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक पार पडले. योग्य पद्धतीने खड्डा काढून फळझाडांची लागवड केल्याने अन्नद्रव्यांचा पुरवठा चांगल्या पद्धतीने होतो, झाडांना योग्य मात्रेत खते देता येतात, आंतरमशागतीची कामे करणे सोयीचे जाते, अशी माहिती कृषिकन्या निकिता गावडे, शशिकला खतकर, धनश्री पाटील, मनस्वी कुंभार, आकांक्षा सायमोते, प्राची पोवाळकर यांनी दिली. या वेळी शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77569 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..