पाऊस आला, पण गडहिंग्लजचे तलाव नाही भरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस आला, पण गडहिंग्लजचे तलाव नाही भरले
पाऊस आला, पण गडहिंग्लजचे तलाव नाही भरले

पाऊस आला, पण गडहिंग्लजचे तलाव नाही भरले

sakal_logo
By

36383
करंबळी : मंगाई ओढ्याला पाणी न आल्याने लघु पाटबंधारे तलावात अद्याप अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही.

पाऊस आला, पण तलाव नाही भरले
गडहिंग्लजमधील चित्र; एकमेव नरेवाडी शंभर टक्के फूल्ल, चित्री-आंबेओहोळ समाधानकारक
अजित माद्याळे : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १५ : गेल्या दहा-बारा दिवसापासून तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. मात्र, त्याला जोर नसल्याने एकही ओढा अद्याप वाहलेला नाही. यामुळे तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव अजून भरलेले नाहीत. गतवर्षीचा पाणीसाठा चांगला असल्याने एकमेव नरेवाडी तलाव आज सकाळी शंभर टक्के भरला. इतर तलावात पाण्याचे आवक नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गतवर्षी ९ ते १८ जून दरम्यान तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे ओढे-नाले तुडूंब भरुन वाहिल्याने सर्व लघु पाटबंधारे तलाव निम्म्याहून अधिक भरले. यंदा जूनमध्ये अपेक्षित असा पाऊसच झाला नाही. ४ जुलैपासून सुरू झालेला पाऊस आजअखेर पडला. रोज पाऊस असला तरी या पंधरा दिवसात एकदाही अतिवृष्टीची नोंद झालेली नाही. एकही ओढा भरुन वाहलेला नाही. यंदाच्या जुलैमधील पाऊस मुरवणी पद्धतीने झाला. यामुळे शेतातून पाणी बाहेर पडलेले नाही. हिरण्यकेशीची पाणीपातळी ही पूर्णत: कोकणातील पावसाने वाढली आहे.
तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव मोठमोठ्या ओढ्यांवर आहेत. ओढे भरून वाहल्यानंतरच तलावामध्ये पाण्याची आवक मोठी होत असते. मात्र यंदा अजून एकही ओढा न आल्याने तलावाच्या पाणी पातळीत अपेक्षित साठा झालेला नाही. गतवर्षी पाटबंधारे खात्याने पाण्याचे नियोजन चांगले केल्याने बऱ्यापैकी पाणी शिल्लक राहिले होते. जुलैमधील पावसाने त्यात किंचीतसा साठा झाला आहे. मात्र समाधानकारक साठा नसल्याने शेतकऱ्यांत भविष्याबाबत चिंता व्यक्त होत आहे. गतवर्षीचा चांगला पाणीसाठा शिल्लक राहिल्याने आज सकाळी केवळ नरेवाडी लघु पाटबंधारे तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. पूर्व भागातील हलकर्णी मंडळमध्ये सर्वात कमी पाऊस असल्याने तेरणी व येणेचवंडी तलावातही अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही.

चौकट...
तलावांमधील पाणी साठा (दशलक्ष घनफूटमध्ये)
तलावाचे नाव *एकूण क्षमता *१५ जुलैपर्यंतचा साठा *टक्केवारी
शेंद्री*६६*४०*६०
वैरागवाडी*५३*२२*४०
करंबळी*१०३*५६*५५
तेरणी*१२३*४६*३७
नरेवाडी*७८*७८*१००
येणेचवंडी*५५*१८*३३
-----------------
हिरण्यकेशी काठ समाधानी
आजऱ्यातील चित्री प्रकल्पामुळे हिरण्यकेशी नदीला बारमाही पाणी मिळते. यामुळे चित्री प्रकल्पातील पाणीसाठ्याकडे शेतकऱ्यांचे विशेष लक्ष असते. १५ जुलैपर्यंत या मध्यम प्रकल्पात १८८६ पैकी १२०० एमसीएफटी पाणी असून ६४ टक्के साठा आहे. आंबेओहोळही १२४० पैकी १०६१ एमसीएफटी पाण्याने भरला असून साठ्याचे प्रमाण ८६ टक्के इतके असते. या प्रकल्पाचेही अतिरिक्त पाणी हिरण्यकेशीला मिळते.
---------------
तालुक्यातील पाऊस दृष्टीक्षेपात
- जूनमधील पाऊस : सरासरी ८२ मि.मि.
- ४ ते १५ जुलैपर्यंतचा पाऊस : सरासरी २९२ मि.मि.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77669 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top