
खासगी पाणी पुरवठा टॅंकरचे दर निश्चित
खासगी टँकरधारकांचे
पाणीपुरवठ्याचे दर निश्चित
कोल्हापूर, ता. १५ : महापूर कालावधीमध्ये शहरास पाणीपुरवठा करणारी उपसा केंद्रे पुराच्या पाण्यामध्ये बुडण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत शहरास होणारा दैनंदिन पाणीपुरवठा काही भागात खंडित होतो. या दरम्यान महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून महापालिकेचे टँकर व भाडे तत्त्वावरील खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. असे असतानाही काही नागरिक खासगी टँकरमार्फत पैसे भरून टँकरची मागणी करतात. परंतु, यावेळी पाण्याची गरज लक्षात घेता खासगी टँकरधारक जादा दराने नागरिकांकडून पाण्यासाठी पैसे आकारत असल्याचे मागील वर्षी निदर्शनास आले होते. या पार्श्वभूमीवर आता खासगी पाणीपुरवठा टॅंकरधारकांच्या पाणीपुरवठ्याचे दर निश्चित केले आहेत.
सध्या पंचगंगेची पाण्याची पातळी वाढत आहे. उपसा केंद्राच्या येथेही पाणी आले आहे. महापूर येऊन पाणी उपसा केंद्रे बंद पडण्याचा धोका आहे. अशी स्थिती निर्माण झाल्यास नागरिकांना योग्य दराने पाणी टँकर मिळावेत, या उद्देशाने प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे पाटील यांच्याकडे दर निश्चितीबाबत पाठपुरावा केला. या सर्वांनी रिझनल ट्रान्स्पोर्ट अर्थोरेटीकडून पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरचे दर त्यांच्या क्षमतेनुसार निश्चित करून दिले आहेत. शहरातील पाणीपुरवठा खंडित झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या दराप्रमाणे खासगी टँकर खरेदी करावेत, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले.
ठळक चौकट
असे असतील दर...
- तीन हजार लिटरचा एक टँकर ः ७०० रुपये
- नऊ हजार लिटरचा एक टँकर ः ८५० रुपये
- बारा हजार लिटरचा एक टॅंकर ः १२०० रुपये
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77692 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..