फिल्टर बसवण्याची भादवणवाडीत मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिल्टर बसवण्याची भादवणवाडीत मागणी
फिल्टर बसवण्याची भादवणवाडीत मागणी

फिल्टर बसवण्याची भादवणवाडीत मागणी

sakal_logo
By

फिल्टर बसवण्याची
भादवणवाडीत मागणी
भादवण : भादवणवाडी (ता. आजरा) येथील ग्रामपंचायतीने जलकुंभाला वॉटर फिल्टर बसवावे. पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी टीसीएल पावडरचा योग्य प्रकारे वापर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन भादवणवाडीचे सरपंच व आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे गढूळ पाणीपुरवठा होऊ शकतो. ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायतीने जलकुंभाला वॉटर फिल्टर बसवावे. त्याचबरोबर पाणी स्वच्छ होण्यासाठी टीसीएल पावडरचा वापर योग्य प्रकारे करावा. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येणार नाही. महाराष्ट्र निर्माण सेनेचे भादवणवाडीचे अध्यक्ष सुरेश मगदूम, उपाध्यक्ष शिवराम कांबळे, तालुकाध्यक्ष अनिल निऊंगरे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77712 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top