आमदार जाधव - अग्निशमन विभागाची प्रात्यक्षिके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार जाधव - अग्निशमन विभागाची प्रात्यक्षिके
आमदार जाधव - अग्निशमन विभागाची प्रात्यक्षिके

आमदार जाधव - अग्निशमन विभागाची प्रात्यक्षिके

sakal_logo
By

36414

आमदार जाधव यांनी अनुभवली
अग्निशमन विभागाची तत्परता

कोल्हापूर, ता. १५ ः मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि रौद्र रूपातील रंकाळा तलाव अशा परिस्थितीत महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अनेक प्रात्यक्षिके सादर केली. एखादी व्यक्ती पाण्यात बुडल्यानंतर त्याला रबरी बोटीद्वारे पाण्यातून लाईफ जॅकेट, फायबर इनर व दोरच्या साहाय्याने कसे वाचवले जाते, याचेही प्रात्यक्षिक दाखविले. अग्निशमन विभागाची तत्परता व सुसज्जता पाहिल्यानंतर महापुराच्या आपत्तीचा सामना करण्यास अग्निशमन विभाग परिपूर्ण असल्याचा प्रत्यय आल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.
शहरात संभाव्य पूरपरिस्थिती ओढवल्यास त्याच्या मुकाबल्यासाठी महापालिकेचा अग्निशमन विभाग तत्पर व सुसज्ज असल्याचे जवानांनी रंकाळ्यात चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करत दाखवून दिले. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत आमदार जाधव यांनी आढावा बैठक घेतली होती. यावेळी महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेतल्यानंतर अग्निशमन विभागाकडून अग्निशमन, शोध व बचावकार्याची प्रात्यक्षिके सादर करण्याचे ठरले होते. यानुसार आज दुपारी आमदार जाधव यांनी रंकाळा तलावावर ही प्रत्यक्षिके अनुभवली.
कटर, स्प्रेडर, स्लॉप कटर, बी. ए. सेट, हायड्रोलिक जॅक, हायड्रोलिक कटर, कॉम्प्रेसर, लिफ्टिंग बॅग, लाईफ लाईन लाँचर, व्हिक्टम लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमेजिंग कॅमेरा, क्विक रिस्पॉन्स व्हेईकलचेही प्रात्यक्षिक दाखवले. माजी उपमहापौर विक्रम जरग, शेखर पवार, संपत चव्हाण, नागेश नलवडे, अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77739 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..