''गोडसाखर'' चा मुख्य चित्रपट विश्रांतीनंतर..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''गोडसाखर'' चा मुख्य चित्रपट विश्रांतीनंतर..!
''गोडसाखर'' चा मुख्य चित्रपट विश्रांतीनंतर..!

''गोडसाखर'' चा मुख्य चित्रपट विश्रांतीनंतर..!

sakal_logo
By

दुरुस्तीसाठी मिळाला कालावधी
गडहिंग्लज : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखाना निवडणूक प्रक्रियाही थांबली. यामुळे ‘गोडसाखर’ची रणधुमाळी थंडावणार असून निवडणूक राजकारणाचा मुख्य चित्रपट आता विश्रांतीनंतर पाहायला मिळणार आहे. परिणामी, इच्छुकांचा हिरमोड झाला. अवघ्या पाचच दिवसांत राष्ट्रवादीतील कागल आणि चंदगड मतदारसंघ असे दोन गट पडल्याचे ठळकपणे जनतेसमोर आले. राष्ट्रवादीतील ही फूट टाळण्यासाठी एका कार्यकर्त्याने पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार केल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, भाजपलाही फुटीचे ग्रहण लागण्याचे संकेत आहेत. जनता दलाचे नेते अ‍ॅड. श्रीपतराव शिंदेंसह त्यांचे सहकारी आणि काँग्रेसचे संग्रामसिंह नलवडे व त्यांच्या शिलेदारांनी आज स्वतंत्रपणे उमेदवारी दाखल केले. या निवडणुकीत काँग्रेसमधील फूटही दृष्टिपथात येत आहे.
निवडणुकीला अडीच महिन्यापर्यंत स्थगिती मिळाली आहे. त्यातच केवळ पाचच दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेतून भविष्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत मिळाले. पुढील कालावधीत आघाड्यांची चर्चा आणि पक्षांतर्गत फूट टाळण्यासाठीची दुरुस्ती करणे संबंधित नेत्यांना सोयीचे होणार आहे. यामुळे अर्ज दाखल करण्यापर्यंतच्या मध्यांतरानंतर आता चित्रपटाच्या उर्वरित भागात राजकीय घडामोडी कशा राहतील, याची उत्सुकता असेलच. राजकीय चित्रपटाचा दुसरा भाग सुरू होईपर्यंत ही उत्सुकता ताणणार की त्याआधीच सस्पेन्स फुटणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77748 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..