प्रा. डॉ. एन. डी. पाटील जयंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. डॉ. एन. डी. पाटील जयंती
प्रा. डॉ. एन. डी. पाटील जयंती

प्रा. डॉ. एन. डी. पाटील जयंती

sakal_logo
By

३६४२२


प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे कार्य पुढे नेणार
प्रा. पाटील प्रतिष्ठानतर्फे जयंती दिनी दोन पुस्तकांचे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे कार्य नेटाने पुढे नेण्याचा निर्धार आज पुन्हा व्यक्त झाला. प्रा. डॉ. पाटील यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचा विचार पुढे नेणाऱ्या चळवळीतील तमाम कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी लिहिलेल्या ‘राजर्षी शाहू ः एक अवलिया पुरूष'' आणि ‘महात्मा जोतिबा फुले ः सर्वंकष सामाजिक क्रांतीचा प्रणेता‘ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. प्रा. एन. डी. पाटील प्रतिष्ठानतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला. ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य विश्वास सायनाकर अध्यक्षस्थानी होते.
प्राचार्य श्री. सायनाकर म्हणाले, ‘‘विवेकाला जे पटले नाही ते प्रा. डॉ. पाटील यांनी कधीही केले नाही. निवडणूकांत यश मिळो किंवा न मिळो पण रस्त्यावरच्या लढाईत आपण नक्कीच जिंकू, हा त्यांना आत्मविश्वास होता आणि तो कार्यकर्त्यांमध्येही त्यांनी नेहमीच पेरला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत येत्या काळातही चळवळ नेटाने पुढे चालू राहिल.‘‘ प्रा. डॉ. पाटील यांच्याविषयीच्या विविध आठवणींनाही त्यांनी यावेळी उजाळा दिला.
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले. प्रतिष्ठानच्या खजानीस सरोज पाटील, एम. के. बाड व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. टी. एस. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष एम. बी. शेख यांनी आभार मानले. प्रा. अशोक चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77776 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top