करूळ घाटात दरड कोसळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करूळ घाटात दरड कोसळली
करूळ घाटात दरड कोसळली

करूळ घाटात दरड कोसळली

sakal_logo
By

३६४०६
करूळ ः घाटात शुक्रवारी कोसळलेली दरड.
३६४०७
करूळ ः येथील घाटात शुक्रवारी कोसळलेली दरड हटविण्याचे काम सुरू होते.

करूळ घाटात दरड कोसळली
वाहतूक ठप्प; एका पाठोपाठ तीन ठिकाणी घटना
सकाळ वृत्तसेवा
गगनबावडा, ता. १५ ः मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुराळे करूळ घाटात आज दुपारी चारच्या सुमारास तीन ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. दोन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, येथील वाहतूक फोंडाघाट आणि भुईबावडा घाटमार्गे वळविली आहे.
दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह करूळ घाट परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्याने करूळ घाटात दरड कोसळण्यास सुरुवात झाली. करूळ तपासणी नाक्यापासून तीन किलोमीटरवर दरड कोसळली. पाठोपाठ आणखी दोन ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. घाटरस्त्याच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरड कोसळल्याची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी वाहतूक फोंडाघाट आणि भुईबावडा घाटमार्गे वळविली. काही अवजड वाहने गगनबावडा आणि वैभववाडीत थांबविली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने दोन जेसीबीच्या साहाय्याने दरड हटविण्यात सुरुवात केली आहे. सायंकाळी सातपर्यंत एका ठिकाणी कोसळलेली दरड हटविली होती. अन्य दोन ठिकाणच्या दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत घाटरस्ता वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.
घाटात आणखी काही ठिकाणी किरकोळ दगडदेखील कोसळले आहेत. एक दोन ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यतादेखील आहे. तालुक्यात आज सकाळच्या सत्रात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. त्यानंतर दुपारपर्यंत हलक्या सरी पडत होत्या. दुपारनंतर काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडणे असे प्रकार झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77803 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top