बॅग घेतल्याशिवाय राऊत कार्यक्रमाला जात नाहीत : क्षीरसागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅग घेतल्याशिवाय राऊत कार्यक्रमाला जात नाहीत : क्षीरसागर
बॅग घेतल्याशिवाय राऊत कार्यक्रमाला जात नाहीत : क्षीरसागर

बॅग घेतल्याशिवाय राऊत कार्यक्रमाला जात नाहीत : क्षीरसागर

sakal_logo
By

बॅगेशिवाय राऊत कार्यक्रमाला जात नाहीत
राजेश क्षीरसागर यांची टीका; वैयक्तिक स्वार्थासाठी माझा वापर
कोल्हापूर, ता. १६ : खोकी घेणे हे मुंबईवाल्याचे काम असते. खासदार विनायक राऊत हे बॅग घेतल्याशिवाय कशालाच येत नाहीत. त्यांची ती खासियत आहे. मला येथे आंदोलने करायला लावून श्री. राऊत स्वतः कॅबिनेटमध्ये डील करत असायचे. त्यांनी माझा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी केला, अशा शब्दात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांच्यावर तोफ डागली.
शिवसेनेच्या काल (ता. १५) झालेल्या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष संजय पवार व खासदार राऊत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी श्री. क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती. त्याला आज श्री. क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, ‘‘श्री. राऊत यांच्यासारखी माणसे पैसे घेतल्याशिवाय कुठे जात नाहीत. निवडणूक असेल किंवा कार्यक्रम त्यांची बॅग तयार ठेवावी लागते. ते ज्येष्ठ आहेत मात्र सगळे पक्ष सहलीप्रमाणे फिरून आलेल्यांचे ऐकून माझ्यावर टीका करत असतील तर ते शिवसेना संपवण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन आलेत. ते बाळासाहेब ठाकरे यांचा एकही शिवसैनिक शिल्लक ठेवणार नाहीत.’’

खासदार शिंदेंसोबत
राज्यातील शिवसेनेचे १४ खासदार श्री. शिंदे यांच्यासोबत आहेत. कोल्हापुरातील मेळाव्याला हजर न राहिलेले खासदार धैर्यशील माने व प्रा. संजय मंडलिक हेदेखील लवकरच तसा निर्णय घेतील, असा दावा श्री. क्षीरसागर यांनी केला.


जेवणाचे बिल स्पीड पोस्टने
शुक्रवारी केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी क्षीरसागर यांनी त्यांच्या निवासस्थानी दिलेल्या जेवणाचे पैसे हे तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून घेतल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते. त्याचा समाचार म्हणून शहर शिवसेनेच्या वतीने राजेश क्षीरसागर यांनी खर्च केलेल्या जेवणाचे बिल स्पीड पोस्टने विनायक राऊत यांना पाठवून राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.


राऊतांविरोधात निदर्शने
खासदार विनायक राऊत यांनी क्षीरसागर यांच्याबद्दल वाद्‍ग्रस्त विधान केल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी वक्तव्याचा निषेध केला. शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजीच्या जोरदार घोषणा देत छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली. या वेळी ऋतुराज क्षीरसागर, शहरप्रमुख जयवंत हरुगले, तुकाराम साळोखे, अश्विन शेळके, कपिल सरनाईक, मंदार तपकिरे, अविनाश कमते, दादू शिंदे, रणजित जाधव, मंगलताई साळोखे, पूजा भोर, मंगल कुलकर्णी, गौरी माळदकर, सुनीता भोपळे, उदय भोसले, सचिन क्षीरसागर, अनिकेत राऊत, अंकुश निपाणीकर, आकाश सांगावकर, किरण पाटील, कपिल नाळे, शैलेंद्र गवळी, कृष्णा लोंढे, अर्जुन आंबी, विनोद हजारे, सुनील माने, रियाज बागवान आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

काय म्हणाले क्षीरसागर 
- जिल्ह्याचा मेळावा घेताना माणसे कुठे होती, किरकोळ गर्दीतील जिल्ह्याचा मेळावा कसा
- २०१९ चा माझा पराभव हा प्री-प्लॅन ठरवून होता. अनेकांनी यासाठी प्रयत्न केले
- काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीदेखील पोटनिवडणुकीत सहकार्याबद्दल अभिनंदन केले.
- आमच्यातील काहींनी पक्षप्रमुखांचे कान भरले
- शिवसेनेमध्ये आपलं ते कार्ट, दुसऱ्याचा बाब्या अशी रीत, यामुळेच कट्टर शिवसैनिक बाहेर पडले

क्षीरसागरांचे पवारांवर टीकास्त्र
- बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा जाळणारे पवार निष्ठावंत व कट्टर कसे. 
- पवारांकडून निवडणुकीत पैसे घेऊन सेटलमेंट
- बिलावरून टीका करणाऱ्या पवारांची मुंबईत मीच सोय केली
- पवार माझ्याच निवासस्थानी राहिले, त्यांचा खर्च मीच केला 
- शिवसेनेत मीच सीनियर आहे, अनेकजण इतर पक्ष फिरून आलेत
- पवार अपशकुनी, त्यांच्या पराभवाने पक्ष फुटला

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77918 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top