म्हैसुर रेल्वे सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

म्हैसुर रेल्वे सुरू
म्हैसुर रेल्वे सुरू

म्हैसुर रेल्वे सुरू

sakal_logo
By

सह्याद्री एक्स्प्रेसची प्रतीक्षा कायम
उदयपूर-म्हैसूर रेल्वे सुरू; रेल्वे प्रवासी संघटना करणार पाठपुरावा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ ः मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी मुंबईत झालेल्या बैठकीत सांगितल्यानुसार उदयपूर-म्हैसूर ही रेल्वे आजपासून सुरू झाली. मिरजमार्गे जाणाऱ्या रेल्वेमुळे उत्तर व दक्षिण भारतात जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांची सोय झाली आहे; मात्र अद्याप कोल्हापुरातून मुंबईला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस तसेच कोल्हापूर-सोलापूर या गाड्या सुरू होण्याची प्रतीक्षा कायम आहे.
उदयपूरमधून सुटणारी गाडी छत्तीसगड, रतलाम, सुरत, पुणे, मिरज, हुबळी, बेंगलोर मार्गे म्हैसूरला जाणार आहे. १६ थर्ड एसटी १, द्वितीय शयनयान १, पेंट्री २, पॉवर कार अशा एकूण २० डब्यांची ही रेल्वे आहे. दर बुधवारी म्हैसूरमधून सुटणारी ही रेल्वे गुरुवारी उदयपूरला पोहचणार आहे. ही गाडी मिरज मार्गे ये- जा करणार आहे.
कोल्हापूर, सांगलीतून उत्तर भारत किंवा दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्यांसाठी या रेल्वेचा उपयोग होणार आहे; मात्र कोल्हापुरातील प्रवाशांना मिरज रेल्वे स्थानकापर्यंत जाऊन तेथूनच या गाडीने पुढे प्रवास करता येणार आहे.
दरम्यान, रेल्वे महाप्रबंधकांनी कोरोना काळात बंद केलेली सह्याद्री एक्स्प्रेस तसेच कोल्हापूर-सोलापूर नियमित गाडी सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटना पुन्हा एकदा या दोन्ही गाड्या कोल्हापुरातून सोडाव्यात, यासाठी पाठपुरावा करणार आहे.

कोट
कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची रोजची संख्या जास्त आहे तसेच सोलापूर मार्गावरही पंढरपूर व तुळजापूरला जाणारे प्रवासी जास्त आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्या लवकर सुरू व्हाव्यात, अशी मागणी आहे. त्यासाठी संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करू.
-शिवनाथ बियाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77948 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..