आपत्‍कालिन नियंत्रण कक्षाचे जिल्‍ह्यावर लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आपत्‍कालिन नियंत्रण कक्षाचे जिल्‍ह्यावर लक्ष
आपत्‍कालिन नियंत्रण कक्षाचे जिल्‍ह्यावर लक्ष

आपत्‍कालिन नियंत्रण कक्षाचे जिल्‍ह्यावर लक्ष

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...


आपत्‍का‍लीन नियंत्रण कक्षाचे लक्ष
पूरस्थितीचे नियोजन; तालुक्यासाठीही अधिकाऱ्यांची नेमणूक
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १६ : जिल्ह्यातील संभाव्य पूरस्‍थितीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्‍हा परिषद मुख्यालयात आपत्‍का‍लीन नियंत्रण कक्ष उभारला आहे. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून गावागावांतील पूरस्‍थितीची माहिती अवगत करण्यात येणार आहे. विशेषत: रस्‍ते बंद होणे, वाहतुकीतील अडथळा, दरड व झाडी कोसळणे याबाबतची माहिती उपलब्‍ध करून मदत पोहोचवली जाणार आहे. जिल्‍ह्यासह तालुक्यालाही अशी यंत्रणा तैनात केली आहे.
जिल्‍हा परिषदेकडून दरवर्षी आपत्‍का‍लीन यंत्रणा कार्यान्‍वित करण्यात येते. बांधकाम विभागाच्या माध्यमातून यंत्रणा उभारली आहे. जिल्‍हा परिषद मुख्यालयातही अशी यंत्रणा आहे. या कक्षाच्या माध्यमातून जिल्‍ह्यामध्ये घडणाऱ्या आपत्‍का‍लीन घटनेची नोंद वेळीच घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती उपाययोजनेसाठी दिली जाणार आहे. उपविभागानी आलेल्या अडचणीवर काय कारवाई केली, याचा अहवाल घेऊन योग्य त्या यंत्रणेकडे सुपूर्द केला जाणार आहे. हा अहवाल जिल्‍हाधिकारी कार्यालयासह शासनास पाठवला जाणार आहे.
महापुरात सर्वाधिक अडचण येते ती रस्‍ता बंद होण्याची. यामध्ये इतर जिल्‍हा मार्ग व ग्रामीण मार्ग, रस्‍त्यांवरील वाहतूक व दळणवळण व्यवस्‍था, रस्ता वाहून जाणे, खचणे, दरड वाहून येणे असे प्रकार घडतात. अशावेळी उपविभागीय स्‍तरावर जेसीबी, पोकलँड, ट्रॅक्‍टर, डंपर व इतर उपयोगी साहित्यांची व्यवस्‍था करण्यात आली आहे. तसेच कंत्राटदारांच्या मदतीने संबंधित रस्‍ता पुर्ववत करण्यासाठीचेही नियोजन करण्यात आले आहे. जिल्‍ह्यात कुठेही अतिवृष्‍टी व महापुरामुळे काही अडचण आल्यास ‍उपकार्यकारी अधिकारी अभियंता अविनाश पोळ (०२३१-२६५६०८३,९४२३०४०१९५) यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोट
महापूर व अतिवृष्‍टीचा सामना करण्यासाठी प्रशासन तयार आहे. पूरग्रस्‍त गावांना सुरक्षित स्‍थळी पोहोचवणे, जीवनावश्यक सुविधा पुरवणे, आरोग्याच्या सुविधा देणे यासह चारा छावण्या, पशुवैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन आहे. लोकांनीही प्रशासनाला सहकार्य करुन सुरक्षितस्‍थळी जाण्यास तयार राहावे.
- संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77955 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..