धान्य व्यापार बंद, निदर्शने - उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धान्य व्यापार बंद, निदर्शने - उलाढाल
धान्य व्यापार बंद, निदर्शने - उलाढाल

धान्य व्यापार बंद, निदर्शने - उलाढाल

sakal_logo
By

36529

धान्यावरील जीएसटी रद्द झालाच पाहिजे
व्यापाऱ्यांची भरपावसात छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने, घोषणाबाजी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : धान्यावरील जीएसटी रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी आज जिल्ह्यातील धान्य बाजार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी भरपावसात छत्रपती शिवाजी चौकात निदर्शने केली. ‘धान्यावरील जीएसटी रद्द झालाच पाहिजे,’ ‘व्यापारी एकता झिंदाबाद’, ‘व्यापारी एकजुटीचा विजय’ असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
अन्न धान्य, खाद्यान्न व गुळावरील जीएसटी कराविरोधात आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशन, किराणा भुसार व्यापारी असोसिएशन, किरकोळ किराणा दुकानदार असोसिएशन, शाहूपुरी मर्चंटस् असोसिएशनने निदर्शने केली.
२०१७ मध्ये जीएसटीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना अन्न धान्यावर जीएसटी लागू होणार नाही, असे शासनाने सांगितले होते. परंतु, ४७ व्या जीएसटी कौन्सिलने अन्न धान्य व खाद्य पदार्थ तसेच गुळावर ५ टक्के जीएसटी १३ जुलैपासून प्रस्तावित असून, अंमलबजावणी १८ जुलैपासून होणार आहे. यातून नॉन ब्रॅंडेड अन्न धान्य, चिरमुरे, गूळ तसेच दही, ताक, लस्सी अशा वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लागू केला आहे. जीवनावश्यक दैनंदिन गरजांच्या वस्तूंवर कर आकारणी होणार आहे. महागाईत भर पडणार आहे. त्यामुळेच या कराविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून आज धान्य व्यापार बंद ठेवून निदर्शने करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीलकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी आणि कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.
आंदोलनात चेंबरचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, संजय पाटील, मानद सचिव धनंजय दुग्गे, वैभव सावर्डेकर, जयेश ओसवाल, ग्रेन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अभय अथणे, गूळ व्यापारी अतुल शहा, चेंबरचे संचालक अजित कोठारी, संपत पाटील, संभाजीराव पोवार, राहुल नष्टे, विवेक शेटे, श्रीनिवास मिठारी, सुरेश लिंबेकर, किरकोळ किराणा असोसिएशनचे संदीप वीर, अरुण सावंत, अनिल धडाम आदी उपस्थित होते.

चौकट
आमदार, जिल्हाधिकऱ्यांना निवेदन
दरम्यान, आंदोलनानंतर व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाऊन आमदार सतेज पाटील, आमदार ॠतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांची भेट घेतली. निवेदन देऊन याबाबत राज्यातील काँग्रेस पक्षातर्फे आवाज उठवावा, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनाही निवेदन दिले असून, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचेकडे हा कर रद्द करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करावा, अशी मागणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77965 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..