जिल्हा कार्यकारणी निवडीवरून शिवसेनेत जुंपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा कार्यकारणी निवडीवरून शिवसेनेत जुंपली
जिल्हा कार्यकारणी निवडीवरून शिवसेनेत जुंपली

जिल्हा कार्यकारणी निवडीवरून शिवसेनेत जुंपली

sakal_logo
By

पवार-क्षीरसागर गट आमने सामने
सत्तांतरानंतरचे नाट्य; जिल्हा कार्यकारिणी निवडीवरून शिवसेनेत जुंपली
कोल्हापूर, ता. १६ : राज्यातील राजकीय स्थित्यंतरामुळे जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आहे. यातच जिल्हा कार्यकारिणीसाठी पदाधिकारी संपर्क अभियान राजेश क्षीरसागर गटाने राबवले तर संजय पवार गटाने कोणत्याही भूलथापांना बाली न पडता स्वार्थी व घातकी लोकांपासून सावध राहण्याचा इशारा पत्रकाद्वारे दिला आहे.
जिल्हा शिवसेनेमध्ये अनेक वर्षांपासून राजेश क्षीरसागर व संजय पवार असे दोन गट सक्रिय आहेत. यात सेनेत राहूनच एकमेकांचे विरोधक असेही चित्र जनतेने पाहिले आहे. सध्याच्या राजकीय स्थितीमुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून दोन्ही गट स्वतःचे अस्तित्व अधिक गडद करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातच संजय पवार, विजय देवणे यांनी जिल्ह्यात शिवसेनेची पुनर्बांधणी करत मेळावा घेतला. राजेश क्षीरसागर यांनी पदाधिकारी संपर्क अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. यात कोल्हापूर, राधानगरी- भुदरगड व शिरोळ येथे नव्याने कार्यकारिणीचे गठन केले जाणार आहे. यासाठी शिवालय येथे आज अनेक इच्छुकांनी हजेरी लावली. यानुसार जिल्हा पातळीवर जिल्हाप्रमुख, महिला आघाडी अशा विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येणार आहेत. या पक्षबांधणीद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे शिवसैनिक आपल्याला घडवायचे असून, या बांधणीतून होणाऱ्या नियुक्त्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
यावर टीका करताना संजय पवार यांच्या वतीने पत्रक प्रसिद्ध केले असून यापत्राद्वारे निष्ठावंत शिवसेनेचे शिवसैनिक, पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांना अवाहन केले आहे. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आहे, तसेच धनुष्यबाण चिन्हदेखील शिवसेनेचेच आहे. ज्या लोकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना फसवले व उद्धव ठाकरे यांचा घात केला. अशा स्वार्थी व घातकी लोकांपासून कायमच सावध राहावे असा इशारा देत शिवसेनेचा व शिवसेनेच्या नावाने मुलाखती घेणाऱ्यांचा कोणताही संबंध नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
क्षीरसागर यांनी या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे सांगितले आहे. शिवसेनेतीलच उघड संघर्षाची ठिणगी विझणार कि भडका उडणार हे वेळच सांगेल.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77966 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..