केवळ ''त्याच'' पदाधिकार्‍यांना मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केवळ ''त्याच'' पदाधिकार्‍यांना मुदतवाढ
केवळ ''त्याच'' पदाधिकार्‍यांना मुदतवाढ

केवळ ''त्याच'' पदाधिकार्‍यांना मुदतवाढ

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून....

प्रशासक नसलेल्या ठिकाणीच
पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ शक्य
माजी पदाधिकाऱ्यांच्या मात्र चकरा

सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १६ : ज्या जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल नजीकच्या काळात संपणार आहे. त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जेथे प्रशासक आहेत, अशा जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना हा निर्णय लागू होत नाही. तरीही काही पदाधिकारी पुन्‍हा आपणालाच मुदतवाढ मिळाल्याचे सांगून गैरसमज पसरवत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. नव्याने मंजूर झालेली विकासकामेही आपण मंजूर केल्याचे सांगून पुन्‍हा मुदतवाढ मिळाल्याचे भासवत आहेत. पंचायत समिती स्‍तरावरही अशीच अवस्‍था आहे. काही माजी पदाधिकारी तर जिल्‍हा परिषदेकडे चकरा मारून मुदतवाढीबाबत अंदाज घेऊ लागले आहेत.
जिल्‍हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापतींचा कार्यकाळ वाढवण्याचे आदेश नुकतेच ग्रामविकास विभागाने दिले आहेत. जिल्‍हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलमांमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन असल्याने कार्यकाळास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. मात्र ही मुदतवाढ ज्या जिल्‍हा परिषद प्रशासकांची नियुक्‍ती झालेली नाही त्या ठिकाणीच लागू आहे. राज्यातील २५ जिल्‍हा परिषदांचा कार्यकाळ संपला असून त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे. या प्रशासकांच्या कार्यकाळास चार महिने पूर्ण झाले आहेत. त्यांनाही दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी प्रशासक आहेत, तेथील पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्याचा काहीच प्रश्‍‍न निर्माण होत नाही. तरीही काही पदाधिकारी या शासन निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून आपणालाच मुदतवाढ मिळाली असल्याचे गावांमध्ये भासवत आहेत. त्यातून ते नव्याने मंजूर विकासकामांवर दावा करू लागले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77972 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top