दीडशे कोटींची उलाढाल थांबली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीडशे कोटींची उलाढाल थांबली
दीडशे कोटींची उलाढाल थांबली

दीडशे कोटींची उलाढाल थांबली

sakal_logo
By

36504

दीडशे कोटींहून अधिक उलाढाल ठप्प
जीएसटीला जिल्ह्यातून कडकडीत विरोध; ग्रामीण भागातूनही प्रतिसाद

सकाळ वृत्तेसवा
कोल्हापूर, ता.१६ ः अन्न धान्य, खाद्यान्न व गूळावरील पाच टक्के जीएसटी कराविरोधात आज जिल्ह्यातील होलसेल व रिटेल धान्य व्यापार बंद ठेवल्यामुळे दीडशे कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल थांबली. शहरातील मार्केट यार्ड आणि लक्ष्मीपुरी येथील होलसेल धान्य व्यापारी लाईन बंद राहिली. जिल्ह्यातील सुमारे साडेचारशे होलसेल तर सुमारे पंधरा हजारांहून अधिक रिटेल व्यावसायिकांनी बंद ठेवून करासाठी जोरदार विरोध दर्शविला. यामुळे ग्रामीण भागातही बंदला प्रतिसाद मिळाला.
सामान्य लोकांशी निगडीत जीवनावश्यक अशा दैनंदिन गरजांच्या वस्तूंवर या कर आकारणीने महागाईत व सर्वसामान्यांच्या नाराजीत मोठी भर पडत आहे. त्यामुळेच आज जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होऊन दैनंदिन जीवनावाश्‍यक वस्तूंवर जीएसटी नकोच ही भूमिका प्रखरपणे मांडली.
मार्केट यार्ड येथे रोज धान्याचे सुमारे दोनशेहून अधिक ट्रक ये-जा करतात. ज्या पद्धतीने आवक होते, त्याच पद्धतीने जावक होते. ही सर्व आवक-जावक आजच्या आंदोलनामुळे बंद राहिली. तेथे रोज किमान दहा आणि कमाल २० ट्रक केवळ तुरडाळीचे येतात. याच बरोबरीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात लक्ष्मीपुरीतील धान्य लाईनमधून मोठ्या प्रमाणात धान्याचा पुरवठा होतो. शहरालगतची गावे याच बाजारेपेठेवर अवलंबून आहेत. ही बाजारपेठही आज बंद राहिली. सध्या पाच टक्के जीएसटी दाखविला जात असला तरीही भविष्यात तो वाढविला जाणार असल्यामुळे हीच वेळ आंदोलन करण्याची असल्याचेही धान्य व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पेठवडगावला शासन धोरणाचा निषेध
पेठवडगाव:येथील वडगाव धान्य व किराणा व्यापारी असोसिएशनने बंद पाळला. पन्नास पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी भाग घेतला.
अन्नधान्य व जीवनावश्‍यक वस्तुव्यतिरीक्त बाकी सर्व व्यवहार सुरळीत होते. धान्यलाईन, सर्व व्यापाऱ्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. अजित होनोले, प्रविण दुर्गुळे, विपुल वडगावे, सुनिल हुकेरी, सत्यंधर भोरे, विनोद कोरे, संजय चौगुले, हेमंत दिगे, विश्वनाथ गाताडे, मोहन माळकर, अनिल बुढ्ढे उपस्थित होते.


राशिवडेत सर्व व्यवहार बंद ठेवून पाठिंवा
राशिवडे बुद्रुक ः दि राशिवडे व्यापारी असोसिएशनच्या वतीने सर्व व्यवहार बंद ठेवून बंद पाळला. अध्यक्ष अमर मगदूम, उपाध्यक्ष अतुल तवटे, सचिव अभय नकाते, कार्याध्यक्ष एकनाथ शिंदे, विश्वनाथ निल्ले यांच्यासह सर्व संचालक, व्यापारी उपस्थित होते. राधानगरी तालुका व्यापारी महासंघाने पाठिंबा देत संपूर्ण तालुक्यातील व्यापाऱ्यांनी बंद पाळला. बंदचे आवाहन महासंघाचे अध्यक्ष एकनाथ चौगले, कार्याध्यक्ष सतीश फणसे सचिव कुंडल पाटील, उपाध्यक्ष सचिन जठार, दिपक तेली यांनी केले होते.

रूकडात मुख्य व्यापार गल्लीत शुकशुकाट
रुकडी ता.१६: येथील व्यापारी असोसिएशने रुकडी बंदचे आवाहन केले होते. या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. मुख्य व्यापार गल्लीत शुकशुकाट होता. ज्येष्ठ व्यापारी बबन मोरे, असोसिएशनचे अध्यक्ष कमरूद्दीन मुजावर, उपाध्यक्ष अमोल मगदुम, सेक्रेटरी बाहुबली पाटील, सुदर्शन पाटील, मोहन चव्हाण, पिनू नांद्रे, नदीम मुजावर, माजी उपसरपंच अमित भोसले, शीतल पाटील, विजय अपराध, भरत भगभगे उपस्थित होते.

कोट
वडगाव, इचलकरंजी, हुपरी, गडहिंग्लज, राधानगरी अशा ग्रामीण भागातील स्वतःची किराणमालाची दुकाने बंद ठेवून या कराला कडकडून विरोध केल्याचे दिसले. होलसेल, तालुक्यातील होलसेलर, ग्रामीण भागातील मोठी दुकाने बंदमध्ये सहभागी झाले. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे दीडशे ते पावणे दोनशे कोटींची उलाढाल थांबली.
-संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स


कोट
मुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यात आज धान्य व्यापाऱ्यांनी बंद पाळला. दहा हजारांहून अधिक कोटींची उलाढाल एका दिवसांत थांबली. ३ लाखांहून अधिक व्यापारी सहभागी झाले होते. राज्यातील सर्व खासदारांना कर रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे. राष्ट्रपती निवडणुकीनंतर येत्या अधिवेशनात हा कर रद्द न केल्यास संपूर्ण देशातील सर्व व्यापार बंद ठेवण्याचा इशाराही दिला आहे.
-ललीत गांधी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीलकल्चर, मुंबई

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77973 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..