निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

36543
अॅड. चंद्रशेखर चिपळूणकर
कोल्हापूर ः वरुणतीर्थ वेश परिसरातील संगीतकार अॅड. चंद्रशेखर चिपळूणकर (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगी असा परिवार आहे. गायिका गौतमी चिपळूणकर यांचे ते वडील होत.
-
36534
अंजनी गोरे
कोल्हापूर ः फुलेवाडी सहावा स्टॉप परिसरातील श्रीमती अंजनी अशोक गोरे (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रमणमळा पोस्टातील पोस्टमास्तर अजित गोरे यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन रविवार (ता. १७) आहे.
-
36545
अनुजा नलवडे
कोल्हापूर ः मंगळवार पेठेतील अनुजा अर्जुन नलवडे (वय ६०) यांचे निधन झाले. लेखक, दिग्दर्शक अर्जुन नलवडे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे पती, मुले, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १७) आहे.
-
36547
राजाक्का जांभळे
कोल्हापूर ः कसबा बावडा येथील राजाक्का आनंदराव जांभळे (वय ६३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १७) आहे.
-
36548
श्रीपती माळवी
सेनापती कापशी ः हसूर खुर्द (ता. कागल) येथील श्रीपती गणू माळवी (वय ७९) यांचे निधन झाले. व्यावसायिक सुभाष माळवी यांचे ते वडील होते. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १७) आहे.
-
01381
रत्‍नाबाई खोत
बिद्री : मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथील श्रीमती रत्‍नाबाई भाऊसो खोत (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १७) आहे. बिद्री येथील दूधसाखर विद्यानिकेतनचे कलाशिक्षक सुनील खोत यांच्या मातोश्री व दूधसाखर ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. सुविधा खोत यांच्या सासू होतं.
-
01726
हिराबाई पाटील
नेसरी : अर्जुनवाडी (ता. गडहिंग्लज) येथील हिराबाई गोविंद पाटील (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे.
विद्यामंदिर अर्जुनवाडी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष परशराम पाटील यांच्या मातोश्री होत.
-
00602
रामराव पाटील
प्रयाग चिखली ः येथील रामराव मारुती पाटील (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार (ता. १७) होणार आहे.
-
03020
सोनाबाई तळेकर
राशिवडे बुद्रुक : येळवडे (ता. राधानगरी) येथील श्रीमती सोनाबाई बळवंत तळेकर (वय ८५) यांचे निधन झाले. माध्यमिक शिक्षक शांताराम तळेकर, पांडुरंग व निवास तळेकर यांच्या त्या आई होत. रक्षाविसर्जन रविवारी (ता. १७) आहे.
-
02728
गुलाब मुल्ला
कबनूर : येथील गुलाब मकबूल मुल्ला (वय ९०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, सुना, नातंवडे असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य राजू मुल्ला यांचे ते वडील होत. जियारत विधी सोमवारी आहे.
-

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y77993 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..