गावागावात हर घर तिरंगा उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावागावात हर घर तिरंगा उपक्रम
गावागावात हर घर तिरंगा उपक्रम

गावागावात हर घर तिरंगा उपक्रम

sakal_logo
By

जिल्‍हा परिषदेतून...


गावागावांत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव; घर, शाळा, कार्यालयांवर फडकणार तिरंगा
सकाळ वृत्तसेवा
कोल्‍हापूर, ता. १६ : स्‍वातंत्र्याच्या अमृतमहोत्‍सवांतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविला जाणार आहे. ११ ते १७ ऑगस्‍ट या काळात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची जय्‍यत तयारी सुरू आहे. राज्यात हर घर तिरंगाची जबाबदारी ग्रामविकास विभागावर दिली आहे. ग्रामविकास विभागाने राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खासगी, सहकारी, शिक्षण संस्‍थांच्या कार्यालयावर राष्‍ट्रध्‍वजाची उभारणी स्‍वत:हून करावी, यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. जिल्‍ह्यातही जिल्‍हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करुन ग्रामस्‍थांना प्रोत्‍साहन दिले जात आहे.
ीया उपक्रमासाठी आवश्यक माहितीचे संकलन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. गावातील घरांची संख्या निश्‍चित करून हर घर तिरंगा उपक्रमाबाबत प्रशिक्षण देऊन जनजागृती केली आहे. जिल्‍ह्यातील शाळा, महाविद्यालये, एनसीसी, एनएसएस, तरुण मंडळे यातून स्‍वयंसेवकांची निवड ली. ग्रामीण भागातील घरांवर, संस्‍थांवर, विविध कार्यालयांवर तिरंगा फडकवण्यासाठी उपलब्‍ध झेंड्यांची संख्याही निश्‍चित करण्याचे काम सुरू असून ३० जुलैपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.
दर दोन दिवसांनी जिल्‍हा परिषदेत या उपक्रमाचा आढावा घेतला जात आहे. जिल्‍ह्यातील जास्‍तीत जास्‍त लोकांनी हर घर तिरंगा उपक्रमात सहभागी व्‍हावे, यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78013 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top