गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

36571
बसर्गे : एस. एम. हायस्कूलमध्ये झालेल्या जिमखाना निवडणुकीतील विजयी विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक.

‘बसर्गे’मध्ये जिमखाना निवडणूक
दुगुनवाडी : बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील एस. एम. हायस्कूलमध्ये शालेय जिमखाना निवडणूक झाली. लोकशाही पद्धतीने दोन गटात ही निवडणूक झाली. अर्ज भरणे, अर्जाची छाननी, अर्ज माघार, मतदार संपर्क, प्रचार या प्रक्रिया पार पाडल्या. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुप्त पद्धतीने मतदान हक्क बजावला. प्रथमेश चौगुले, प्रथमेश थोरात (मुख्यमंत्री), संजना संकेश्‍वरी, श्रीशैल रायापगोळ (सहल मंत्री), आदित्य चव्हाण, आदर्श पाटील (आरोग्यमंत्री), श्रेया चौगुले, ओम टोणपी (बागमंत्री), सानिका वालकर, गार्गी जाधव (क्रीडामंत्री), समीक्षा कोण्णूर, पवन मोटे (सांस्कृतिक मंत्री), यश चौगुले, गणेश कोळी (प्रार्थना मंत्री), सानिया ताशिलदार, सिद्धी हसूरकर (श्रमसंस्कार मंत्री), सृष्टी जाधव, राधिका फडतरे (विद्यार्थिनी प्रतिनिधी) यांची निवड झाली. मुख्याध्यापक आनंदा वाघराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एस. घुले, एस. पी. रेडेकर, एस. बी. ढवणे, एम. एस. जोडगुद्री, आर. डी. कुंभार, सौ. एस. डी. करडे, ए. बी. नंद्यानावर, एस. बी. पाटील, बी. एम. हिरेमठ, सौ. ए. बी. चौगुले यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
----------------
36572
औरनाळ : संत बाळूमामा यांचा प्रतिमा, कपडेपूजन व हालसिद्धनाथ देवाचा वालंग सोहळ्यानिमित्त निघालेली मिरवणूक.

औरनाळला वालंग सोहळा
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथे संत बाळूमामा यांचा प्रतिमा, कपडेपूजन व हालसिद्धनाथ देवाचा वालंग सोहळा उत्साहात झाला. चार दिवस चाललेल्या या सोहळ्याचे १३ वे वर्ष होते. सुमारे दहा हजार भाविकांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. काकड आरती, पूजा, अभिषेक, आरती, हरिपाठ, हरिजागर, ज्ञानेश्‍वरी पारायण, गीता पारायण, बाळूमामा विजय ग्रंथाचे वाचन आदी धार्मिक कार्यक्रम दररोज झाले. पुंडलिक गवळी, विश्‍वनाथ पाटील, बाळकृष्ण परीट यांचे प्रवचन, तर नाना पाटील, दिगंबर खोत यांचे कीर्तन झाले. बाळूमामा मालिकेतील बालकलाकार समर्थ पाटील यांची मुलाखत झाली. राम कुंभार यांचा भक्तीगितांचा कार्यक्रम झाला. दत्त संगीत सोंगी भजन व बाळूमामा भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला. हालसिद्धनाथ देवाच्या वालंग सोहळ्याची शिस्तबद्ध मिरवणूक निघाली. औरनाळ, बड्याचीवाडी, गडहिंग्लज, मासेवाडी, जाधेवाडी, भादवणवाडी, भैरापूर, मत्तिवडे, आदमापूर, दुंडगे, हसूरचंपू, कडगाव येथील भजनी मंडळांनी हरिजागर केला. दिंडी प्रदक्षिणा, काल्याच्या अभंगाने सोहळ्याची सांगता झाली. सद्‌गुरू बाळूमामा भक्त मंडळ व ग्रामस्थांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते.
--------------------
घाळी महाविद्यालयात बी. लिब प्रवेश सुरू
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा बी. लिब अँड आय. एससी. (ग्रंथालय आणि माहितीशास्त्र शिक्षणक्रम) हा एक वर्षाचा शिक्षणक्रम सुरू आहे. त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणाऱ्यांना या शिक्षणक्रमाला प्रवेश घेता येईल. दर रविवारी तासिका घेऊन हा शिक्षणक्रम पूर्ण केला जातो. त्यामुळे नोकरी करीत असतानाही हा शिक्षणक्रम पूर्ण करता येतो. प्रवेशाची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे. इच्छुकांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78090 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..