डॉ. पांडुरंग पुजारी शोकसभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. पांडुरंग पुजारी शोकसभा
डॉ. पांडुरंग पुजारी शोकसभा

डॉ. पांडुरंग पुजारी शोकसभा

sakal_logo
By

36706

डॉ. पांडुरंग पुजारी म्हणजे
‘माणसातील देवमाणूस’
---
आनंदयात्री परिवारातर्फे आदरांजली
कोल्हापूर, ता. १७ ः आनंदयात्री परिवाराचे संस्थापक सदस्य डॉ. पांडुरंग पुजारी यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शाहूपुरीतील गुजराती विद्यालयाच्या सभागृहात शोकसभा झाली.
डॉ. पुजारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर झालेल्या शोकपर मनोगतात आनंदयात्री परिवाराचे संस्थापक सदस्य आप्पासाहेब इनामदार, के. एस. गुंड-पाटील यांनी आनंदयात्री परिवाराचे कार्य जोमाने पुढे सुरू ठेवणे हीच डॉ. पुजारी यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना व्यक्त केली. डॉ. चंद्रकांत पाटील यांनी डॉ. पुजारी हे वैद्यकीय व्यवसायाच्या पलीकडे जाऊन सेवा देणारे माणसातील देवमाणूस होते, असे सांगितले. आनंदयात्री परिवाराचे सदस्य डॉ. दीपक जोशी, डॉ. शिरीष पटवर्धन, डॉ. अरुण धुमाळे, शिरीष पुजारी, प्राचार्य शशिकांत शिंदे, जसवंत शहा, डी. जी. कुलकर्णी, दिनेश डांगे, तात्यासाहेब मोरे, ॲड. मिरजे, डॉ. भालचंद्र कोरे, विजयश्री जोशी, महेंद्रभाई दलाल, स्नेहधामचे प्रा. विजय मारुलकर, हेल्पर्स ऑफ दि हॅंडिकॅप्डचे पी. डी. देशपांडे यांनी शोक व्यक्त केला. सुनील व प्रमिला बत्तासे, ॲड. सुजाता गुंड-पाटील, बाळासाहेब मानवी, बाबासाहेब मोकाशी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78208 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..