निधन वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निधन वृत्त
निधन वृत्त

निधन वृत्त

sakal_logo
By

36775
अजित पाटील
कोल्हापूर ः दुधाळी येथील हॉटेल व्यावसायिक अजित शामराव पाटील- घरपणकर (वय ५१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले आहेत. रक्षाविर्सजन सोमवार (ता. १८) आहे.

०६९६१
बनूबाई पाटील
घुणकी : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील बनूबाई शामराव पाटील (वय ८५) यांचे निधन झाले. मंगल वाचनालयाचे सदस्य संभाजी पाटील यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १८) तळसंदे येथे आहे.

०६९५९
महादेव घोडके
घुणकी, ता. १७ : बिरदेवनगर-जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील महादेव गणपती घोडके (वय ६८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. १९) रोजी बिरदेवनगर येथे आहे.

३६७११
सखूबाई चोपडे
तारदाळ : खोतवाडी येथील श्रीमती सखूबाई शामराव चोपडे (वय ८५) यांचे निधन झाले. खोतवाडीचे सरपंच संजय चोपडे यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

००६३६
शांताबाई पाटील
दानोळी : येथील श्रीमती शांताबाई भूपाल पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. त्या माजी ग्रामपंचयात सदस्य अरुण पाटील यांच्या आई होत. त्यांच्या मागे एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता. १८) आहे.

०००२२
द्रौपदी सादळे
रांगोळी ः येथील द्रौपदी नारायण सादळे (वय ८६ यांचे निधन झाले. सोसायटी व पैसाफंड बॅंकेचे संचालक आप्पासो नारायण सादळे यांच्या आई होत. त्यांच्या मागे पती, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

०३२१९
प्रियवृंदा जाधव
कंदलगाव ः आर. के. नगर येथील प्रियवृंदा प्रतापराव जाधव (वय ७०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार (ता. १८) आहे.

०२३९९
ज्ञानदेव मिसाळ
माजगाव ः यवलूज (ता. पन्हाळा) येथील सेवानिवृत्त शिक्षक ज्ञानदेव धोंडिराम मिसाळ (वय ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार (ता.१९)आहे.


३६७१०
प्रशांत भाट
कोल्हापूर ः गुलमोहर कॉलनी पाचगाव येथील प्रशांत मधुकर भाट (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, वडील, बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.१८) आहे.

02401
सुदाम शिंदे
माजगाव ः माजगाव पैकी शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथील सेवानिवृत्त एसटी बसचे कंडेकटर (वाहक) सुदाम गणपती शिंदे (७५) यांचे निधन झाले. एसटी बसचे कर्मचारी संजय शिंदे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन सोमवार (ता.१८) आहे.

02897
इंदूताई सावंत
उत्तूर ः येथील इंदिरानगर मधील इंदुताई दत्तू सावंत (वय ५०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे भाऊ, भावजय, भाचे असा परिवार आहे. दादू सावंत यांच्या त्या भगिनी होत.


३६७५८
मारुती वडगावे
गडहिंग्लज : शहरातील संभाजीनगर परिसरातील निवृत्त शिक्षणाधिकारी मारुतीराव धोंडिराम वडगांवे (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे, पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78215 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..