इचल : महापूर धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : महापूर धोका
इचल : महापूर धोका

इचल : महापूर धोका

sakal_logo
By

महापुराचा धोका
टळलेला नाही ः मराठे
इचलकरंजी, ता. १७ ः पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी अद्याप महापुराचा धोका टळलेला नाही. त्यामुळे धरणातून योग्य प्रमाणात विसर्ग सुरू ठेवण्याची गरज आहे, असे मत महापूर अभ्यासक कौशिक मराठे यांनी व्यक्त केले. कोयना धरण सध्या ५३ टक्के भरलेले असून वारणा ७२, दूधगंगा ६१ आणि राधानगरी धरण ७२ टक्के भरलेले आहे. या सर्व मोठ्या धरणांनी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांची ५० टक्के ही मर्यादा आताच ओलांडलेली आहे. पुढील काळात आणखी दोन मोठे पाऊस दरवर्षीप्रमाणे येण्याची शक्यता आहे. त्या वेळी पूर आलेला असताना पुन्हा धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागल्यास पुराचे महापुरात रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच योग्य प्रमाणात धरणांतून पाण्याचा विसर्ग करणे आवश्यक आहे. त्यामुळे संभाव्य महापूर टाळता येऊ शकतो. त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे श्री. मराठे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78242 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..