थॅलेसिमीया रूग्ण तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थॅलेसिमीया रूग्ण तपासणी
थॅलेसिमीया रूग्ण तपासणी

थॅलेसिमीया रूग्ण तपासणी

sakal_logo
By

थॅलेसेमिया रुग्णांची मोफत तपासणी
कोल्हापूर, ता. १७ ः फाईट अगेन्स्ट थॅलेसेमिया ऑर्गनाइझेशन व महाराष्ट्र एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलतर्फे थॅलेसेमिया रुग्णांची मोफत तपासणी शिबिर झाले. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या सहयोगाने दैवज्ञ बोर्डिंग येथे शिबिर झाले. यात ३० रुग्णांनी लाभ घेतला.
थॅलेसेमिया रुग्णांच्या अंगात रक्त तयार होत नसल्याने दर १५ ते २१ दिवसाला रुग्णाला रक्त देण्याची वेळ येते. तसेच आयुष्यभर या रुग्णांना औषध व रक्तपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागते. या आजारातून कायमचे बरे होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्स्प्लाट सर्जरी हाच पर्याय तूर्त आहे, मात्र त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. अशी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्णांच्या बोन मॅरोची गुणसूत्रे रक्ताच्या नात्यातील कोणाशी जुळतात हे पाहावे लागते. त्या तपासणीला एचएलए तपासणी म्हटले जाते. या तपासणीचा खर्च १७०० तर म्युटेशन तपासणीचा खर्च ८ हजार रुपये, तर आरबीसीचा तपासणीचा खर्च काही हजार रुपयांचा असतो. अशा तपासण्या या शिबिरात मोफत करण्यात आल्या.
हिमॅटोलॉजीस्ट डॉ. वरून बाफना, डॉ. रुचिरा सेन, ऑर्गनाइझेशनचे अध्यक्ष धनंजय नामजोशी, अभिजित बुधले, उमेश पाटील, अनिष पोतदार, मंदार कामत, संदीप पाडळकर आदींनी सहकार्य केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y78253 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..